पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन पुरवणारा गजाआड ; ८८ लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८८ लाख रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी एका महिन्याच्या आत दुसरी मोठी कारवाई केली आहे.
शोलोडॉये सॅम्युअल जॉय (वय-४४ रा. उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.

कपड्यांचा व्यवसाय असल्याचे सांगून तो व्यावसायिक व्हिसावर फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतात आला होता. काही काळ तो मुंबईत राहिला होता. त्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यातील उंड्री परिसरातील रावत कॅप्सस्टोन सोसायटीत एका फ्लॅटमध्ये रहात होता. तो रहात असलेल्या फ्लॅटमध्ये कोकेनच्या छोट्या-छोट्या पुड्या तयार करून त्या उच्चभ्रू वस्तित राहणाऱ्या नशेखोरांना विकत असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरक्षीक विजय टेकाळे यांनी पथक तयार करून जॉय याचा शोध घेतला. जॉय रहात असलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८७ लाख ९६ हजार रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन, ३ लाख ६८ हजार रुपये रोख, मोबाईल, तीन घड्याळ, वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण ९१ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टेकाळे, पथकातील कर्मचारी अविनाश शिंदे, राहूल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’