Cocktail Drug in India : आजपासून मिळू शकते कॉकटेल ड्रग, केवळ एक डोसने होईल कोविडचा उपचार, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसविरूद्धचे शस्त्र कॉकटेल ड्रग भारतातील हॉस्पिटलमध्ये वापरण्यासाठी तयार आहे. वृत्त हे आहे की, गुरुवारी राजधानी दिल्लीच्या रूग्णांना हे औषध मिळू शकते. हे अँटीबॉडी कॉकटेल देशात मागील सोमवारी लाँच झाले होते. हरियाणातील एक ज्येष्ठ ही व्हॅक्सीन घेणारे पहिले व्यक्ती बनले. विशेष गोष्टी ही आहे की, या औषधाचा वापर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

या औषधाची निर्मिती फार्मा कंपनी रॉश आणि सिप्लाने केली आहे. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे की, रॉशने भारत सरकारला या ड्रगचे 10 हजार डोस दिले आहेत. तर, केंद्राने याचे वितरण राज्यांना करण्यास सुरूवात केली आहे. भारतात कॉकटेल औषधाचे काम सिप्लाच्या देखरेखीत होईल. भारतात नुकतीच या औषधाला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गेनायजेशन (सीडीएससीओ) ने अलिकडेच अँटीबाडी कॉकटेलला इमर्जन्सी यूज ऑथोरायजेशन म्हणजे ईयूए दिले आहे. याशिवाय औषध अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या अनेक देशांत ईयूए मिळाले आहे. रॉश इंडिया आणि सिप्लाकडून सोमवारी लाँच केलेल्या या औषधाची किंमत 59 हजार 750 रुपये प्रति डोस असेल.

वक्तव्यानुसार, या औषधाच्या पॅकची किंमत 1 लाख 19 हजार 500 रुपये असेल. प्रत्येक पॅकमध्ये दोन रूग्णांवर उपचार केला जाऊ शकतो. संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी एकच डोसची आवश्यकता असेल.

देशातील प्रमुख एक्सपर्टपैकी एक डॉक्टर नरेश त्रेहान यांनी बुधवारी म्हटले की, हे औषध कोविड-19 च्या हलक्या ते मध्यम प्रकरणात उपयोगी ठरत आहे. त्यांनी माहिती दिली होती की, हे अँटीबॉडी कॉकटेल कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंट बी.1.617 वर सुद्धा परिणामकारक आहे. हाच व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळला होता.