सावधान ! सोशल मीडियावर राजकीय पोस्ट टाकणाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने ‘हा’ घेतला मोठा निर्णय

निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषीत झाल्यानंतर निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. निवडणुकीत सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता त्यावरही आयोगाची करडी नजर आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी आयोगाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसह इतरांकडून सोशल मीडियाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मीडियाची मंगळवारी (दि.१९) बैठक बोलावली होती. यामध्ये सोशल मीडियावरही आचार संहिता लागू करण्यावर चर्चा करण्यात आली. फेसबूक, ट्विटरसह इतर सोशल मीडिया, मोबाईल आणि इंटरनेट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सोबत चर्चा करण्यात आली. यामुळे स्वतंत्र, निपक्षपातीपणे शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आचारसंहितेचे पालन होण्यास मदत होणार आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या धर्तीवरच ही आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाच्या बैठकीत इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया, फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, गूगल, शेअरचॅट, टिक टॉक, बिग टीव्ही यांसारख्या सोशल मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.