आचारसंहिता लागू झाल्यानंतरही सुरूच राहणार ही 10 कामं ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आज निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना आचारसंहिता लागू झाल्याचीही घोषणा केली. निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली म्हणजे आता सर्व सरकारी कामं बंद होणार, असा समज सर्वसामान्यांचा असतो. पण नक्की काय करण्यावर बंदी आहे, आणि कोणती कामे चालू राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला नियमभंगामुळे तुरुंगाची हवा खावी लागू शकते. आम्ही याठिकाणी आचारसंहिता लागू असतानाही सुरु राहणार असणाऱ्या १० कामांची यादी देत आहोत.

१. आधारकार्ड बनवणे, दुरुस्त करणे

२. साफसफाई संबंधी काम

३. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत

४. वीज आणि पाण्यासंबंधी काम

५. पेंशन संबंधी कामे

६. जाती प्रमाण पत्र आणि इतर आवश्यक प्रमाणपत्र बनवण्याची कामे

७. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.

८. रस्त्याच्या दुरुस्तीची कामे

९. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही

१०. यासहित अन्य काही जीवनावश्यक आणि आपत्कालीन कामे आचारसंहितेचे कारण पुढे करून सरकारी अधिकारी टाळू शकणार नाहीत.

Visit :- policenama.com