Homeताज्या बातम्याCOEP Jumbo Covid Centre | 'ओमायक्रॉन'च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका 'अलर्ट' !

COEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Covid Variant | झपाट्याने संसर्गित होणार्‍या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरींयटचा प्रवेश झाल्याने केंद्र व राज्याकडून ‘अलर्ट’ मिळाल्याने पुणे महापालिका (Pune Corporation) कामाला लागली आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी आज शिवाजीनगर येथील इंजिनिअरींग कॉलेजच्या आवारातील जंबो कोव्हिड हॉस्पीटलला (COEP Jumbo Covid Centre) भेट देउन पाहाणी केली.

 

मागीलवर्षी कोरोनाची पहिली लाटेच्यावेळी रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने उपचारासाठी राज्य शासन आणि महापालिकेने इंजिनिअरींग कॉलेज अर्थात सीओईपीच्या मैदानावर ८०० आसन क्षमतेचे जंबो कोव्हिड हॉस्पीटल (COEP Jumbo Covid Centre) उभारले. मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या हॉस्पीटलमध्ये यावर्षी जुलैपर्यंत साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. दुसर्‍या लाटेनंतर रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर यावर्षी ३ जुलैला या हॉस्पीटलमधील उपचार सुविधा बंद करण्यात आली आहे. परंतू स्टॅबिलिटी रिपोर्ट आणि कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने जंबो हॉस्पीटलला (COEP Jumbo Covid Hospital) मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये अफ्रिकेमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन (Omicron Covid Variant) हा जलदगतीने संसर्ग पसरविणारा नवीन व्हेरियंट आढळल्याने संपुर्ण जगातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
केंद्र आणि राज्य शासनानेही या व्हेरियंटची गांभिर्याने दखल घेतली आहे.
अशातच नुकतेच कर्नाटकमध्ये परदेशातून आलेल्या काही कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये हा व्हेरीयंट आढळल्याने अधिकच काळजी घेण्याचे आदेश देशातील आरोग्य यंत्रणांना दिले आहेत.
याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (pmc health department chief dr ashish bharti)
व अन्य विभागाच्या प्रमुखांनी आज जंबो कोव्हिड हॉस्पीटलला भेट दिली.
हॉस्पीटलसाठी सर्व साहीत्याची सद्यस्थितीचा आढावा घेउन ‘रेडी पोझीशन’ मध्ये ठेवण्याच्या संबधित विभागांना सूचना देण्यात
आल्याची माहिती महापालिकेतील अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title :- COEP Jumbo Covid Center | Pune Municipal Corporation ‘Alert’ on the background of Omicron Covid Variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

Pune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक ! निलम केवट, प्रमोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्यावर FIR

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News