Coffee-Alzheimer Disease | जर तुम्हाला सुद्धा आहे वारंवार कॉफी पिण्याची सवय तर राहणार नाही ‘या’ मोठ्या आजाराचा धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Coffee-Alzheimer Disease | जर तुम्ही सुद्धा त्या लोकांपैकी आहात ज्यांची सकाळी हॉट कॉफी (Hot Coffee) शिवाय होत नाही, तर अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. एका संशोधनानुसार, जे लोक जास्त कॉफीचे (Coffee) सेवन करतात, त्यांना अल्जायमर (Alzheimer) होण्याचा धोका कमी असतो. हे संशोधनत फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे. (Coffee-Alzheimer Disease)

 

मीडिया रिपोर्टनुसार, एडिथ कोवान युनिव्हर्सिटी (ECU) च्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये 200 पेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन लोकांना सहभागी करण्यात आले.

 

संशोधनात आढळले की, जे लोक जास्त कॉफीचे सेवन करतात, त्यांच्यात अल्जायमर होण्याची रिस्क कमी असते आणि त्यांच्यापैकी कुणालाही स्मृतीभ्रंशची (Memory Loss) कोणतीही समस्या नव्हती.

 

तज्ज्ञ डॉ. सामंथा गार्डनर यांनी म्हटले की, हे संशोधन कॉफी आणि अल्जायमर रोगाशी संबंधित अनेक महत्वाच्या मुद्द्यांशी संबंध दाखवते.

डॉ. सामंथा यांनी म्हटले की, आम्हाला आढळले की, रिसर्चमध्ये भाग घेणार्‍यांना कोणताही स्मृतीभ्रंश नव्हता.
त्यांनी म्हटले की, जास्त कॉफीचे सेवनसुद्धा मेंदूत अमाइलॉईड प्रोटीनचा संचय संथ करण्याशी संबंधी असल्याचे दिसून आले,
जे अल्जायमर रोगाच्या विकासाचे एक प्रमुख कारक आहे.

 

मात्र, डॉ. गार्डनर यांनी हे सुद्धा म्हटले की, या विषयावर आणखी संशोधनाची आवश्यकता आहे,
संशोधन खुप उत्साहजनक होते कारण यातून संकेत मिळतो की,
कॉफी पिणे अल्झायमर रोगाच्या सुरुवातीला उशीर करण्यात मदत करण्याची एक सोपी पद्धत होऊ शकते. (Coffee-Alzheimer Disease)

 

Web Title :- Coffee-Alzheimer Disease | research says coffee can reduce risk of alzheimer disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parambir Singh | कोर्टानं फरार घोषित केलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर मुंबईत अवतरले

एकविसाव्या शतकाला साजेशी जीवन पद्धतीला अनुसरून सलग्न व समकालीन शिक्षण व्यवस्था

ST Workers Strike | आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

Retired ACP Shamsher Khan Pathan | ’26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी अतिरेकी कसाबचा मोबाईल लपवला’; निवृत्त ACP शमशेर खान-पठाण यांचा आरोप

Coronavirus in Maharashtra | राज्यात आज रुग्णांची संख्या कमी पण मृत्यूची संख्या वाढली, गेल्या 24 तासात 1043 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Nashik | जामीन मिळवून देण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि Police शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात