Coffee Benefits | कॉफी पिण्याने कमी होतो ‘या’ आजारांचा धोका! जाणून घ्या किती कप पिणे आहे लाभदायक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण दिवसाची सुरुवात 1 कप स्ट्राँग कॉफीने करतात (Coffee Benefits). टेस्टी आणि हेल्दी कॉफी प्यायल्याने शरीरात एनर्जी येते आणि छान वाटते. अलीकडील संशोधनानुसार, कॉफीचे सेवन काही गंभीर आजारांमध्ये मदत करू शकते जसे की, टाइप 2 मधुमेह, फॅटी लिव्हर डिसिज (Type 2 Diabetes, Fatty Liver Disease) आणि काही कॅन्सरमध्ये मदत होऊ शकते (Coffee Benefits).

 

या अभ्यासात असेही म्हटले गेले की, जर एखाद्याने माफक प्रमाणात कॉफी घेतली तर हृदयाशी संबंधित आजाराचा (Heart Related Diseases) धोकाही कमी होतो. पण कॉफीचे जास्त सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. परंतु, जर ती योग्य प्रमाणात सेवन केली तर शरीराला अनेक फायदे होऊ शकतात (Coffee Benefits).

 

आहारतज्ञ हेलन बॉन्ड यांच्या मते, उकळलेल्या कॉफीमध्ये कॅफेस्टोल आणि काहवेल (Cafestol Or Cahvel) नावाचे नैसर्गिक तेल असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचे उत्पादन कमी होते. परंतु सध्याच्या काळात बहुतेक लोक फिल्टर केलेली कॉफी घेत आहेत, ज्यामुळे कमी फायदा होत आहे.

 

जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, दररोज कॉफीच्या सेवनाने हृदयाच्या समस्या 3 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. कॅफिनचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. किती कप कॉफी पिण्याचे कोणते फायदे आहेत आणि किती प्रमाणात कॉफी शरीरासाठी योग्य आहे ते जाणून घेवूयात (Let’s Know How Much Coffee Is Good For The Body)…

 

1. एक कप कॉफी (1 Cup Coffee)
एक कप कॉफीमध्ये सुमारे 100 मिलीग्राम कॅफिन (Caffeine) असते. दररोज 1 कप कॉफी घेतल्याने सतर्कता वाढते आणि आतड्यांसंबंधी हालचाल होण्यास मदत होते. सायकोफार्माकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित 2012 च्या अभ्यासानुसार, जे लोक 1 कप कॉफी घेतात त्यांना कमी थकवा येतो आणि ते सतर्क राहतात.

 

त्याच बरोबर, कॉफी पाचक होर्मोन्स (Digestive Hormones) सोडते, जे आतड्यांतील बॅक्टेरिया सक्रिय करतात, ज्यामुळे आतड्यांसंबंधी आरोग्यास फायदा होतो.

2. दोन कप कॉफी (2 Cup Coffee)
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट न्यूट्रिशन यूएसच्या (International Society Of Sport Nutrition US) मते, जे लोक दिवसातून 2 कप कॉफी घेतात त्यांच्या व्यायामाच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते. संशोधनात असे आढळून आले की जे लोक स्पोर्ट अ‍ॅक्टिव्हिटी करत आहेत जे लोक दिवसातून 2 कप कॉफी घेतात, अशा लोकांची सहनशक्ती आणि वेग (Endurance And Speed) वाढतो.

 

संशोधनात सहभागी लोकांना 3 ते 6 मिलीग्राम प्रति किलो वजनाच्या दराने कॅफिन देण्यात आले. त्यानुसार, जर एखाद्याचे वजन 65 किलो असेल आणि त्याला प्रति किलो शरीराच्या वजनासाठी 3 मिलीग्राम कॅफिन दिले गेले तर त्याला एकूण 195 मिलीग्राम कॅफिन दिले गेले, जे प्रति 2 कप प्रती 200 मिलीग्राम इतके होते. तसेच, दिवसातून 2 कप किंवा त्याहून अधिक कॉफीचे सेवन केल्याने हार्ट फेल होण्याची शक्यता 30 टक्क्यांनी कमी होते.

 

3. तीन कप कॉफी (3 Cup Coffee)
प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या युरोपियन जर्नलमध्ये (European Journal Of Preventive Cardiology) प्रकाशित अभ्यासानुसार, जर एखादी व्यक्ती दिवसातून 3 कप किंवा त्याहून अधिक कॉफी घेत असेल तर स्ट्रोकची (Stroke) शक्यता 21 टक्क्यांनी कमी होते. याशिवाय हृदयरोगाचा धोका 12 टक्के आणि मृत्यूचा धोका 17 टक्क्यांनी कमी होतो.

 

4. चार कप कॉफी (4 Cup Coffee)
जे दररोज 4 किंवा त्याहून जास्त कप कॉफीचे सेवन करतात त्यांना नॉन-अल्कोहोल (Non-alcoholic) रोगाचा धोका 19 टक्क्यांनी कमी होतो. युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्प्टन आणि एडिनबर्गच्या (University of Southampton and Edinburgh) संशोधनानुसार, दररोज 3-4 कप कॉफीचे सेवन केल्याने लिव्हरच्या कर्करोगाचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.

 

5. पाच कप कॉफी (5 Cup Coffee)
स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, जे लोक दररोज 5 कप कॉफी घेतात त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका 29 टक्क्यांनी कमी होतो.

 

कॉफी बीनमध्ये असलेले कॅफीक अ‍ॅसिड आणि क्लोरोजेनिक अ‍ॅसिड (Caffeic Acid And Chlorogenic Acid)
हे अ‍ॅमिलॉइड पॉलीपेप्टाइड साचून राहण्यास प्रतिबंध करू शकते. जे इन्सुलिन तयार करणार्‍या पेशी नष्ट करू शकते.

6. सह कप कॉफी (6 Cup Coffee)
बोस्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, 6 कप कॉफीचे सेवन केल्याने सांधेदुखीचा धोका कमी होऊ शकतो.
संशोधनानुसार, जे लोक दररोज 6 कप कॉफी घेतात त्यांना संधिवात होण्याची शक्यता 59 टक्के कमी होती आणि
जे लोक दररोज 5 कप कॉफी घेतात त्यांना गाउट होण्याची शक्यता 40 टक्क्यांपर्यंत कमी होते.

 

WebMD नुसार, कॅफिनयुक्त कॉफीमुळे निद्रानाश, अस्वस्थता, पोटदुखी, मळमळ, उलट्या, हृदय गती वाढणे, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे, निद्रानाश
(Insomnia, Malaise, Stomach Pain, Nausea, Vomiting, Increased Heart Rate, Increased Respiratory Rate, Insomnia)
यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय सतत जास्त कॉफी घेतल्याने डोकेदुखी, चिंता, कानात आवाज येणे,
हृदयाचे ठोके अनियमित होणे, डोकेदुखी, छातीत दुखणे असे त्रास होऊ शकतात.

 

Clevelandclinic च्या मते, सामान्य लोकांनी 400 मिलीग्रामपेक्षा जास्त कॉफी किंवा सुमारे 4 कप कॉफी घेऊ नये.
400 मिलीग्राम कॉफी कोलाच्या 10 कॅनच्या समतुल्य आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Coffee Benefits | coffee caffeine benefits in type 2 diabetes headache mental alertness and death how much coffee caffeine is too much

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

 

Body Hydration Tips | ‘या’ ऋतूमध्ये शरीराच्या हायड्रेशनवर विशेष लक्ष ठेवा, ‘या’ गोष्टींचं सेवन फायदेशीर; जाणून घ्या

 

Diabetes | मधुमेहींनी ‘या’ गोष्टींचं सेवन चुकून देखील करू नये, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं; जाणून घ्या