‘हे’ घातक आजार टाळण्यासाठी करा कॉफीचे सेवन, रोग राहतील दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – योग्य प्रमाणात कॅफीन सेवन केल्यास आरोग्यास फायद्याचे ठरते. २०० ते ३०० मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते. कॉफीमुळेआळसही निघून जातो. मात्र, गरजेपेक्षा जास्त कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी घातकही ठरू शकते.

Related image

कॅन्सर
जपानच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या महिला दररोज नियमितपणे तीन कप कॉफी पितात त्यांना कोलोन कॅन्सरचा धोका कमी असतो, परंतु ज्या महिला कॉफीचे सेवन करत नाहीत त्यांना हा धोका जास्त असतो. २००७ मध्ये केलेल्या एका संशोधनानुसार जे लोक दररोज एक कप कॉफी पितात त्यांना पार्किन्सनचा धोका ५० टक्के कमी असतो.

Image result for स्मरणशक्ती

स्मरणशक्ती वाढवा
वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती कमजोर होते. परंतु, जे वयोवृद्ध लोक नियमितपणे कॉफीचे सेवन करतात त्यांच्या मेंदूची कार्यप्रणाली अनियमित होण्याचा वेग मंदावतो. अशावेळी वारंवार विसरण्याची सवयही सुटू शकते.

Image result for गॉलस्टोन्स

गॉलस्टोन्स
ज्या महिला दररोज दोन-तीन कप कॉफीचे सेवन करतात त्या महिलांना गॉलस्टोन्समुळे शस्त्रक्रिया करवून घेण्याच्या स्थितीचा २५ टक्के कमी सामना करावा लागतो. अशा प्रकारे पुरुषांमध्ये गॉलस्टोनची शक्यता कमी केली जाऊ शकते.

Image result for अल्झायमर

अल्झायमर
जे नियमितपणे तीन कप कॉफीचे सेवन करतात, त्यांना अल्झायमर होण्याची शक्यता ६५ टक्के कमी असते. कॉफीचे सेवन केल्याने मेंदूत एकत्र येऊन अल्झायमर होण्यास कारणीभूत प्रोटिनची निर्मिती मंदावते, असे संशोधक सांगतात.

Image result for संधिवात

संधिवात
जे नियमितपणे तीन-चार कप कॉफीचे सेवन करतात त्यांना संधिवात होण्याची शक्यता ४० टक्के कमी होते. तसेच दोन कप कॉफीमुळे लिव्हर सोरायसिसचा धोका ८० टक्क्पर्यंत कमी होतो.

Image result for हृदयरोग

हृदयरोग
तीन कप कॉफीचे दररोज सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका २० टक्क्यांपर्यंत कमी होतो, असे २००९ मध्ये झालेल्या एका संशोधनात आढळले आहे. कॉफीतील अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची कार्यप्रणाली चांगली राहते. ज्या महिला दोन-तीन कप कॉफीचे सेवन दररोज करतात त्यांना हृदयरोगांमुळे होणारा धोका २५ टक्क्यांपर्यंत कमी असतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/