कॉफीच्या तत्वांमुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका होतो कमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चहाऐवजी आता कॉफीचं सेवन वाढलं आहे. त्यामुळे कॉफीच्या फायद्यांवर आणि तोट्यांवर नेहमीच चर्चा होते. एका संशोधनानुसार भारतात पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरची सर्वात जास्त प्रकरणं आढळतात. प्रोस्टेट कॅन्सरबाबत पुरूषांना धोका अधिक असतो. कारण ते या कॅन्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण कॉफीमध्ये आढळणारे खास तत्व या कॅन्सरच्या तत्वांना रोखतात.

कनाजावा विश्वविद्यालयाच्या संशोधकांच्या संशोधनानुसार कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टोल नावाचे तत्व जे कॉफीमध्ये आढळतात ते प्रोस्टेट कॅन्सर वाढण्यासपासून रोखतात. कॉफीमध्ये आढळणारे तत्व कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टॉल नावाचे तत्व एकप्रकारे हायडड्ढोकार्बन आहेत. हे दोन्ही तत्व जे प्रोस्टेट कॅन्सरला रोखण्यास मदत करतात ते कॉफीमध्ये नैसर्गिक पद्धतीने आढळतात. शोधात ज्या कॉफीचा समावेश करण्यात आला होता, त्या कॉफीला अरेबिका कॉफी नावाने ओळखले जाते.

कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टोल पेशींची वाढ रोखू शकतात. कहविओल एसिटेट आणि कॅफेस्टोल तत्वांचा प्रयोग उंदरांवर केला गेला. या तत्वांमुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखली. पण यांचं एकत्र असणं जास्त प्रभावी ठरतं. हा शोध करणाऱ्या टीमने कॉफीमध्ये नैसर्गिक पद्धतीने आढळणाऱ्या सहा तत्वांचं परीक्षण केलं. हा शोध बार्सिलोना इथे झालेल्या यूरोपियन असोसिएशन ऑफ यूरोलॉजी कॉंग्रेसमध्ये सादर करण्यात आला.