भारतात IT सेक्टरसाठी खुशखबर ! ‘ही’ कंपनी यावर्षी करणार 28 हजार फ्रेशर्सची भरती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. मात्र, या दरम्यान एक चांगली बातमी सुद्धा समोर आली आहे. आयटी सर्व्हिसशी संबंधीत कंपनी कॉग्नीजंट (Cognizant) ने म्हटले आहे की, ते यावर्षी भारतात 28 हजार फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखत आहेत.

यापूर्वी मागील वर्षी कंपनीने 17 हजार फ्रेशर्सची भरती केली होती. कॉग्नीजंटमध्ये एकुण सुमारे 2 लाख 96 हजार 500 कर्मचारी आहेत. यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त भारतातून आहेत. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार कॉग्नीजंटचे सीईओ ब्रायन हमफ्रायस यांनी सांगितले की, कंपनी सध्याच्या संघर्षातून पुढे जाण्यासाठी योग्य दिशेने काम करत आहे.

ब्रायन यांनी म्हटले की, कंपनीत मागील काही महिन्यात राजीनाम्यांमुळे काही अडचणी असतील कारण भारतात दोन महिन्याचा नोटीस कालावधी आहे. अशावेळी क्वॉर्टर-2 मध्ये समस्या होऊ शकते. मात्र, हा आमच्या मॉडलेमध्ये पुढे जाण्याचा रस्तासुद्धा आहे. दरम्यान, आम्ही विक्रमी गतीने लोक कामावर ठेवत आहोत आणि अतिरिक्त भरती सुद्धा करणार आहोत.

ब्रायन यांच्यानुसार कंपनी कर्मचार्‍यांना रोखून ठेवण्यासाठी सुद्धा अनेक आघाड्यांवर कम केले जात आहे. यामध्ये अंतर्गत प्रकारे कामाबाबत आणि प्रयत्न वाढवणे तसेच करयिर विकासाची संधी प्रदान करण्यासह प्रशिक्षण इत्यादीचा समावेश आहे. सोबतच तिमाही स्तरावर पदोन्नतीसह महत्वाच्या पदांसाठी वेतनवाढ आणि प्रमोशनचा सुद्धा समावेश आहे.