DMK च्या ‘या’ माजी आमदाराच्या घरावर छापा, सिक्रेट कॅमेर्‍याच्या बॉक्समध्ये मिळाला ‘खजाना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात नोटबंदीनंतर जुन्या नोटा ठेवणे बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे, परंतु कोयंबतूरधील डीएमकेचे माजी आमदार एलनगो यांचा मुलगा आनंद याच्या घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्या आहेत. घराच्या सिक्रेट रूममधील संदुकीमध्ये जुन्या नोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला, त्यात 2 लाख 68 हजार रुपयांच्या जुना नोटा आणि 667 पेपरचे बंडल जप्त करण्यात आले आहे. कागदाचे बंडल अगदी जुन्या नोटांसारखे दिसतात.

माजी आमदाराच्या मुलाकडे बनावट नोट असल्याची माहिती मिळताच डीएसपी वेलुमुरगन यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने चेन्नईच्या घरावर छापा टाकला. मात्र, छापा टाकल्यानंतर माजी आमदारांच्या मुलाने स्पष्टीकरण दिले की, ज्या घरामध्ये या नोटा सापडल्या आहेत, ते घर दरमहा अडीच लाख रुपये भाड्याने दिले होते. तसेच त्याने जुन्या नोटांबद्दल सांगितले की, या नोटा त्यांच्या नाहीत, त्यांनी रशीद, शेख आणि फिरोज नावाच्या व्यक्तीला हे घर भाड्याने दिले होते. हे सर्व लोक करंपूकदेईचे रहिवासी होते.

घराचा मालक आणि माजी आमदार आनंद यांचा मुलगा यांच्यावरही पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा एका गुप्त खोलीत लपविल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोटा प्रचलित असलेल्या नव्या नोटासह बदलण्याची तयारी सुरू होती. सीक्रेट रूममधून पोलिसांकडून नोट मोजणी यंत्र, स्टेपलिंग मशीन आणि एक एअर गन जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी सांगितले कि, या लोकांनी अशी अफवा पसरविली होती की, दोन लाख रुपयांच्या जुन्या नोटा दिल्यास लोकांना एक लाख रुपयांच्या नवीन नोटा मिळतील. केंद्र सरकार पुन्हा जुन्या नोटा चलनात आणू शकते या निराधार गोष्टीबद्दल ही अफवा पसरविण्यात आली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुध्द भादंवि कलम 109, 120 बी, 420, 489 (बनावट चलनाचा वास्तविक चलनाचा वापर म्हणून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/