नोटाबंदीनंतर आता ‘नाणेबदली’, लवकरच येणार 20 रुपयांचं नवं नाणं

नवी दिल्ली : चलनात लवकरच 20 रुपयांची नवीन नोट येणार होती. परंतु नोट की नाणे यावर विचारमंथन सुरु होते. यादरम्यान मात्र 20 रुपयांच्या नाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच 20 रुपयांचे नाणे चलनात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता एक रुपयांच्या नाण्यापासून ते 10 रुपयांच्या नाण्यांमध्येही केद्र सरकारकडून बदल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नाण्यांचे डिझाईनही नवीन असणार आहे. नोटाबंदीच्या धाडसी निर्णयानंतर सरकारकडून आता नाणेबदली करण्यात येणार आहे.

नोटाबंदीनंतर मोदी सरकार नाणेबदली करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे आजच दिल्लीत याबाबत बैठक पार पडली आहे. मुख्य म्हणजे नवीन येणाऱ्या नाण्यांच्या टोटाईप डिझाईनही तयार झाल्या आहेत. येणारे 20 रुपयांचे नवीन नाणे अगदी अंध व्यक्तीलाही सहज ओळखता येईल असे असणार आहे.  20 रुपयांचे नवीन नाणे अष्टकोणीय आकाराचे असणार आहे. नाण्यांच्या डिझाईनसह 20 रुपयांच्या नवीन नाण्यासाठी भारतीय नाणे अधिनियम 2011 नुसार संवैधानिक प्रकियेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे असेही समोर आले आहे.

मार्च 2019 पर्यंत चलनात असणार  26 हजार कोटी रुपयांची नाणी 
यापूर्वी 2011 मध्ये नाण्यांच्या डिझाईनमध्ये भारतीय प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (सिक्युरिटी प्रिंटिंग एंड मिंटिंग कारपोरेशन इंडिया लिमिटेड-एसपीएमसीआइएल) ने बदल केला होता. हा बदल  ‘भारतीय नाण्यांची नवीन साखळी 2011’ असा संबोधन्यात आला होता. तेव्हा 50 पैशांपासून ते 10 रुपयांपर्यंतच्या प्रत्येक नाण्यावर 1 रुपयाचे चिन्ह ठेवण्यात आले होते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2018 पर्यंत भारतीय बाजारात 25,600 कोटी रुपयांची नाणी होती. तर, मार्च 2019 पर्यंत ही नाणी 26 हजार कोटीपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.
नाण्यांतून दिला जाणार सामाजिक संदेश 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता येणाऱ्या नवीन नाण्यांतून सामाजिक संदेश देण्यात येणार असे समजत आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद यांनी याबाबतची सूचना केली होती. शेप अँड साइज ही भारत सरकारशी संलग्नित असणारी संस्था नाण्यांच्या डिझाईनसंदर्भात विशेष सूचना घेते. त्यानंतरच, नाण्याचे डिझाईन निश्चित केले जाते.