क्रिप्टोच्या बाजारात CoinSwitch Kuber चा बोलबाला, क्रिप्टो संबंधित सर्व गरजा करत आहे पूर्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  CoinSwitch Kuber | जगभरात सध्या क्रिप्टोकरन्सीचे आकर्षण वाढत आहे. दर महिन्याला नवनवीन क्रिप्टोकरन्सी बाजारात लाँच होत आहेत. मात्र, अनेक लोकांना करन्सीबाबत खुप कमी माहिती आहे. अशाच लोकांच्या मदतीसाठी आशीष सिंघल, गोविंद सोनी आणि विमल सागर यांनी मिळून कॉईनस्वीच कुबेर (CoinSwitch Kuber) नावाचा एक मोबाइल अ‍ॅप्लीकेशन प्लॅटफार्म बनवला आहे. जो संस्थात्मक गुंतवणुकीद्वारे लोकांच्या सर्व गरजा पूर्ण करेल.

 

भारताची सर्वात मोठी क्रिप्टो कंपनी

 

CoinSwitch Kuber 10 मिलियनपेक्षा जास्त यूजर्स आणि 1.9 बिलियन डॉलर्सच्या मुल्यांकनासह भारताची सर्वात मोठी क्रिप्टो कंपनी बनली आहे.
जिची किंमत 1.9 बिलियन डॉलर आहे आणि ती क्रिप्टो बाजारात भारताची दुसरी मोठी युनिकॉर्न आहे.

 

अमेरिकन कंपनीची गुंतवणूक

 

अमेरिकन उद्योग भांडवल फर्म आंद्रेसेन होरोविट्ज (Andreessen Horowitz) ने या भारतीय स्टार्टअपमध्ये 80 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आणि कॉइनबेस एक अमेरिकन क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफार्म, ज्याने पहिल्यांदा अमेरिकेच्या बाहेर एखाद्या संस्थेत 150 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

 

या कंपन्यांनी घेतला सहभाग

 

असे करून या दोन मोठ्या कंपन्यांनी CoinSwitch Kuber चे व्यवसाय मॉडल आणि भारताच्या क्रिप्टो बाजारात आपला विश्वास दाखवला आहे.
सध्याचे गुंतवणुकदार पॅराडाईम, रिबिट कॅपिटल, सिकोइया कॅपिटल आणि टायगर ग्लोबलने सुद्धा नवीन फंडिंग सत्रात भाग घेतला.

 

यूजर्स साइन अपमध्ये 1,800% ची झेप

 

CoinSwitch Kuber ने जून 2020 मध्ये भारता संचालन सुरू केले होते आणि केवळ 14 महिन्यातच भारताची सर्वात मोठी क्रिप्टो-एक्सचेंज बनली.
या कंपनीने आपल्या यूजर्स साइन अपमध्ये 1,800% ची झेप घेतली आहे. याचा वापर करणे खुपच सोपे आहे.
केवळ एका क्लिकने तुम्हाला 80 पेक्षा सुद्धा जास्त क्रिप्टोकॉइन निवडण्याचा सल्ला दिला जातो.

 

50 मिलियन भारतीयांचा करणार समावेश

 

या स्टार्टअपमध्ये बहुतांश क्रिप्टो यूजर्स 28 पेक्षा कमी वयाच्या आहेत, जे पहिल्यांदा क्रिप्टो बाजारात गुंतवणूक करत आहेत आणि ज्यांच्याकडे खुप कमी किंवा काहीही अनुभव नाही.
या कंपनीने यूजर्स साइन अपमध्ये 1,800% ची वाढ नोंदली गेली आहे.

 

कॉइनस्विच कुबेरने म्हटले की, आता ते आपल्या प्लॅटफॉर्मवर 50 मिलियन भारतीयांचा समावेश करणे आणि नवीन उत्पादने लाँच करण्यासाठी या गुंतवणुकीत केलेल्या पैशाचा वापर करतील.

 

कंपनीला आणखी पुढे नेणार

 

CoinSwitch Kuber चे सह-संस्थापक आणि CEO आशीष सिंघल यांनी महटले की, मागील एक वर्षापासून आमचे लक्ष भारतीय ग्राहकांसाठी एक मजबूत उत्पादन विकसित करण्यावर राहिले आहे.
आता या फंडिंगसह, आम्ही भारताच्या प्रत्येक घरात क्रिप्टो आणण्याचे आमच्या मिशनमध्ये स्वताला पुढे नण्याची अपेक्षा करतो.

 

Web Title : CoinSwitch Kuber | coinswitch kuber is making a splash in the crypto market fulfilling all the crypto related needs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

Pune News | पुण्यामधील पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुढील 4 वर्षांमध्ये पुर्ण करणार; सोमवारपासून सर्वेक्षण सुरु होणार

PhonePe द्वारे मोबाइल रिचार्ज करणे पडणारा महागात, UPI पेमेंटवर सुरू केली प्रोसेसिंग शुल्क ‘वसूली’; जाणून घ्या