केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोक, पेप्सीसह बिस्लेरीला ठोठावला दंड ; जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बेकारेज मेकर्स कोक, पेप्सी आणि बाटलीबंद पाणी निर्मिती करणारी कंपनी बिस्लेरी यांना प्लॅस्टिक कचरा विल्हेवाट लावण्याविषयी आाणि संकलनाविषयी माहिती न दिल्याबद्दल दंड ठोठावला आहे.

हिंदुस्तान कोका-कोला पेयेवर 0.66 कोटी रुपयांचा आकारला दंड
प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारी दंड आकारला असून संबंधित कंपन्यांना त्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बिस्लेरी कंपनीला 10.7575 कोटी, पेप्सीको इंडिया होल्डिंग्ज आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज यांना 7.7 कोटी आणि 60.66 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रामदेव बाबांच्या पतंजलीलाही ठोठावलाय एक कोटीचा दंड
कोक, पेप्सी आणि बिस्लेरी व्यतिरिक्त योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीलाही प्लॅस्टिक कचरा विल्हेवाट लावण्याविषयी आाणि संकलनाविषयी माहिती न दिल्याबद्दल दंड ठोठावला आहे. पतंजलीला 1 कोटी आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि पेप्सीको यांच्या संयुक्त उद्यम नौरिस्को बेव्हरेज यांना 85.9 लाख रुपये दंड ठोठावला आहे.

बिस्लेरीचा प्लॅस्टिक कचरा सुमारे 21500 टन झाला असून या कंपनीला प्रति टन 5000 रुपये दंड आकारण्यात आला आहे. पेप्सीकोचा कचरा 11,194 टन होता.

दंड 15 दिवसांत भरण्याचे आदेश
विशेष म्हणजे, प्लॅस्टिक कचर्‍याबाबत एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पांसिबिलिटी अशी एक पॉलिसी आहे. ज्याच्या आधारे प्लॅस्टिक कंपन्यांना उत्पादनाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. या सर्व कंपन्यांना ठोठावण्यात आलेला दंड 15 दिवसांत भरावा लागेल, असे सीपीसीबीने म्हटले आहे.