हवामान विभागानं दिला आणखी एक इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्रावर आलेले हे अस्मानी संकट आणखी कायम राहण्याचे चिन्ह आहे. 20 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात वीजांच्या गडगडाटासह अनेक भागात पाऊस पडणार असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कुलाबा वेधशाळेनं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक भागात पावसाची शक्यतावर्तवली आहे. मुंबई आणि आसपास भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज कमी असल्याचा अंदाज देखील वेधशाळेने वर्तवला आहे. पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच अजून नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज तर मराठवाड्यासह बहुतेक जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात अजून परतीच्या पावसाळा सुरुवात झालेली नाही. पण त्याआधीच हा पाऊस पडणार असल्याने चिंता वाढली आहे. परत पुढील काही दिवसांमध्ये परतीचा पाऊस असल्याने महाराष्ट्रामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होणार असल्याचा देखील अंदाज आहे.

मुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. सोलापूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्र मोठ्या संकटाला समोर जात आहे. काही ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार असल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी या भागाची पाहणी करून कर्ज काढावे आणि लोकांना या संकटातून बाहेर काढावे’ अशी सूचना देखील पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.