महाराष्ट्रात हुडहुडी वाढली, पुणे @ ९.६

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा चांगलाच वाढला आहे. गेल्या आठवड्यामध्ये पुण्याचा पारा १०. ५ अंश इतका होता तो आता ९.६ अंशापर्यंतं खाली आला आहे. तर गेल्या २४ तासात धुळे येथे सर्वाधीक निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर दुचाकीवरुन प्रवास करणारे स्वेटर, कानटोपी, हातमोजे यांचा वापर करुन थंडीपासून आपला बचाव करीत आहेत.

सगळीकडे थंडी वाढत असताना पणजीमध्ये सगळ्यात उबदार 32.5 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये 7.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. पण सध्या नाशिकपेक्षाही थंड धुळे आहे. गेल्या आठवड्यात निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे त्यामानाने नाशिकही गारठलं आहे.

कोल्हापूरमध्ये थंडीने गारठून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. कोंबडी बाजार भागात ही घटना घडली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या कोल्हापुरात 15.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान होतं.

कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोलीसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पावसाला पोषक हवामान निवळल्यामुळे राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. किमान तापमानात घट झाल्यामुळे गारढा वाढायला पुन्हा सुरूवात झाली आहे.