Cold Moon 2020 : आज आणि उद्या दिसणार वर्षातील शेवटचा ‘फुल मून’, जाणून घ्या यास का म्हणतात ’कोल्ड मून’

नवी दिल्ली : 2020 संपण्यास आता दोनच दिवस बाकी राहिले आहेत. या दरम्यान अंतराळात आणखी एक खगोलीय घटना होणार आहे. 29 आणि 30 डिसेंबरला यावर्षीचा शेवटचा फुल मून  (Full Moon) दिसणार आहे. यास कोल्ड मून (Cold Moon) म्हटले जाते. हा 2020 चा 13वा फुल मून असेल. तो पाहण्यासाठी संपूर्ण जगात लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

माहितीनुसार, फुल मून 30 डिसेंबर 2020 ला अंतरराष्ट्रीय वेळेनुसार 3.39 वाजता सकाळी आपल्या शेवटच्या टप्प्यात असेल. भारतात हे दृश्य 30 डिसेंबरला सकाळी सुमारे 9 वाजता दिसेल. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार हा कोल्ड मून आशिया, पॅसिफिक क्षेत्र, युरोप आणि अफ्रीकेत बुधवारी दिसेल. तर दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि कॅनडासारख्या पश्चिम गोलार्धाच्या देशांमध्ये तो 29 डिसेंबरच्या रात्री 10:29 वाजता (स्थानिक वेळेनुसार ईएसटी) दिसेल.

ख्रिसमसनंतर तोबडतोब होत असल्याने यास उत्तर अमेरिकेत लाँग नाईट्स मून म्हणतात. युरोपमध्ये यास मून आफ्टर यूल म्हटले जाते. उत्तर गोलार्धातील देश या घटनेच्या दरम्यान थंड हवामानाला सामोरे जात आहेत. तर दक्षिण गोलार्धातील देश सध्या गरम हवामानाचा अनुभव घेत आहेत. मात्र, ही घटनेला उत्तर गोलार्धातील देशातील हवामानानुसार कोल्ड मूनच म्हटले जाते.

यापूर्वी 21 डिसेंबरला 800 वर्षानंतर गुरू आणि शनी ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ आले होते. पृथ्वीवरून पाहिल्यास दोघेही एकाच ग्रहाप्रमाणे दिसत होते. हे दोन्ही ग्रह यापूर्वी 17व्या शतकात महान खगोलतज्ज्ञ गॅलीलियोच्या जीवनात इतक्या जवळ आले होते.

2020 मध्ये खगोलीय घटना जास्त होत्या. मात्र 2021 सुद्धा काहीसे असेच असणार आहे. 2021 मध्ये सूर्य, पृथ्वी आणि चंद्राची वाटचाल जगभरातील खगोलप्रेमींना एक पूर्ण चंद्रग्रहण आणि एक पूर्ण सूर्यग्रहणासह ग्रहणांची चार रोमांचक दृश्य दाखवेल. परंतु भारतात यापैकी केवळ दोनच खगोलीय घटना दिसतील.