Cold Nose Treatment | अखेर हिवाळ्यातील थंडीत नाक का होते थंड, जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cold Nose Treatment | हिवाळा आल्याची चाहुल सर्वप्रथम नाकालाच लागते. हिवाळा सुरू होताच काही लोकांचे नाक थंड पडते, विशेषता तेव्हा जेव्हा ते घराच्या बाहेर पडतात. हिवाळ्यात नाक थंड पडणे एक वेगळीच समस्या आहे. कितीही गरम कपडे घातले तरी नाक थंडच राहते. काही व्यक्तींचे नाक सुन्न पडते. (Cold Nose Treatment)
नाक थंड पडण्याची समस्या सर्वात जास्त त्या लोकांना होते ज्यांना थॉयराईड, निमोनिया, डायबिटीज इत्यादी समस्या आहेत. अखेर ती कोणती कारणे आहेत ज्यामुळे काही व्यक्तींचे नाक हिवाळ्यात थंड पडते, ते सविस्तर जाणून घेवूयात…
नाक थंड होण्याचे कारण :
बाहेर थंडी वाढते तेव्हा शरीराचे पहिले काम असते शरीराच्या महत्वाच्या आतील अवयवांना सर्दीच्या संकटापासून वाचवणे. अशावेळी महत्वाच्या अवयवांमध्ये ब्लड सर्क्युलेशन जास्त होऊ लागते. (Cold Nose Treatment)
दुसरीकडे शरीराच्या बाहेरील अवयव जसे की, हात, पाय, नाक, इत्यादीमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी होऊ लागते. याच कारणामुळे हिवाळ्यात काही व्यक्तींचे नाक खुपच थंड पडते, कारण तिथपर्यंत सर्क्युलेशन कमी होऊ लागते.
नाक कसे ठेवावे गरम :
– बाहेर पडताना स्वेटर, मफलर ई. गरम कपडे घाला.
– नाक, हात, पाय यांना मालिश करत राहा, यामुळे ब्लड सर्क्युलेशन होत राहील.
– बाहेर पडल्यावर नाकाला मसाजसारखे हलक्या हाताने रगडत रहा.
– प्रयत्न करा की, दररोज नाकात वाफ घेता येईल. यामुळे ब्लड सर्क्युलेशन होत राहील.
– दिवसात एकदा गरम सूप प्या.
– चहा आणि कॉफीचे सेवन करा.
– कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
– या उपायांनी पण नाक गरम झाले नाही तर, डॉक्टरांशी संपर्क साधा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Cold Nose Treatment | why some peoples nose facing extreme cold know the reason and preventive measures
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे