काय सांगता ! होय, ‘कोलगेट’नं आणला चक्क ‘स्मार्टफोन’ला ‘कनेक्ट’ होणारा ‘टूथब्रश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2020) या वर्षी 7 ते 10 जानेवारीपर्यंत अमेरिकेतील नेवादा राज्यात आयोजित करण्यात येत आहे. हा इव्हेन्ट सुरू होण्यापूर्वीच नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टस जगासमोर येऊ लागले आहेत. कोलगेटने यादरम्यान स्मार्टफोनला कनेक्ट होणारा टूथब्रश सादर केला आहे.

कंपनीने सांगितले की, Plaqless Pro स्मार्ट इलेक्ट्रिक टूथब्रश ब्लूटुथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट होऊ शकतो. यामध्ये एक टायनी एमबॅडिड सेंसर लावण्यात आला आहे, जो ब्रश वापरत असताना आपल्या तोंडाची तपासणी करतो. तसेच काही समस्या आढळ्यास पांढरी रंगाची लाईट निळ्यारंगाची होते. कोलगेटचा हा नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित ब्रेश पाहण्याची ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. हा ब्रश वापरण्याचा अनुभव घेण्याचीही ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/