विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ सहन झाली नाही 20 वर्षीय प्राजक्ताला, केली आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   कोल्हापूर जिल्ह्यातील नणुंद्रे तालुका पन्हाळा येथिल महविद्यालयीन युवतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आाला आहे. या युवतीने ही आत्महत्या गावातील टवाळखोर तरुणांकडून वारंवार होणाऱ्या विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळाला कटांळून केली आहे. युवतीच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संतप्त जमावाकडून संशयित आरोपिंच्या घरावर हल्ला केला आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव प्राजक्ता सुरशे बाऊचकार (वय 20) आहे. तरुणीच्या वडिलाचे 10 वर्षापुर्वी सर्पदंशाने निधन झाले असून ती आपल्या आईसमवेत गावात राहत होती. याचाच फायदा घेत गावातील तीन तरुण प्राजक्ताची छेड काढत होते. हा प्रकार येथेच थांबला नसून तिच्या मोबाईलवर फोन करुन मेसेज पाठवून तिला नाहक त्रास देत होते. दरम्यान याच त्रासाला कटांळून तरुणीने शेतात फवारण्यात येणारे तणनाशक प्राशन केले. ही घटना 23 ऑक्टोबरला घडली असली असून आज उपचारा दरम्यान प्राजक्ताचा मृत्यू झाला आहे. संशयित आरोपी नावे प्रतीक पाटिल, अजित पाटील आणि अक्षय चव्हाण असे असून तिघांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.