शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांचा अपघातात मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांच्या कारला झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत.

चालक कुलदिप भटेसिंग रावल (वय ३४ रा. दोंडाईचा, चालक), पत्नी उर्मिला अनिल देशमुख (वय ४५), मुलगा भार्गव अनिल देशमुख (वय १९, मुलगा), हरवाबाई बटेसिंग रावल (वय ६५, सासु) अशी जखमींची नावे आहेत.

प्रा. अनिल देशमुख हे त्याच्या वॅगन आर (एम एच १८ एजे ५४६६) ने आपल्या कुटुंबीयांसमवेत सक्राळी येथे नातेवाईकांना पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी लोणखेडा खेतीया रस्त्यावरील श्री विष्णू नारायण मंदीराजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. रस्त्याच्या उजव्या बाजूकडून अचानक तीन चार महिला रस्ता ओलांडत असल्याचे गाडी चालक कुलदीप बटेसिंग रावल यांना दिसले. त्यानंतर त्यांनी अचानक ब्रेक दाबल्याने गाडी पलटी झाली. तीन ते चार पलटी वेळा पलटी झाल्यानंतर गाडी रस्त्या लगतच्या ब्रासमध्ये पडली. त्यामुळे गाडीत पुढे बसलेले अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. त्यांना लागलीच रस्त्यावरील नागरीकांनी शहरातील सार्थक क्रिटीकेअर सेंटर येथे आणले. तेथे डॉक्टरांनी अपघातापुर्वीच त्यांना मृत घोषित केले. तर नातेवाईकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच जि प सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक संदिप पाटील, रविंद्र जमादार, भाजपाचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा भरत देसले, समन्वयक प्रा. डी. सी. पाटील, खजिनदार प्रा. गणेश सोनवणे, तालुका अध्यक्ष प्रा आय. डी. पाटील , प्रा. जे. बीं पवार, प्रा. डी. एन. वाघ, प्रा. पी. यु. धनगर सह असंख्य शिक्षक व नातेवाईक यांनी रुग्णालयात गेले.

प्रा. देशमुख हे साठे महाविद्यालय, विले पार्ले, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला होते. ते गत चार वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी महासंघाचे सचिवपद सांभाळले होते. त्यांच्या कार्यकाळात झालेली सर्व आंदोलने यशस्वी होण्यासह शिक्षकांचे अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावलेत. शिक्षकांच्या आग्रहास्तव त्यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूकहीलढवली होती. त्यांच्या अपघाती निधनाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात आज काळा दिवस उगवला