पर्यटकांनो सावधान ! ‘वरंधा’ घाटातील रस्ता खचल्याने बनलाय धोकादायक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जोरदार पावसामुळे भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. तसेच काही ठिकाणी दरडी कोसळण्याची भिती आहे. निकृष्ट कामामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा रस्ताही खराब झाला असून रस्त्याच्या कडेला असलेली सुरक्षा कठडे तुटून गेले आहेत. पावसाळ्यात या भागातील निर्सग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला असून त्यामुळे वाहने खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेव्हा पर्यटकांनो जर वरंधा घाटात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असाल तर जरा जपून जा. दुचाकी व चारचाकीवरुन जाताना उगाच हुल्लडबाजी न करता घाटरस्त्याची अवस्था लक्षात घ्या.

भोर-महाड रोडवरील वरंधा घाटातील धारमंडप ते वाघजाईदरम्यानच्या रस्त्यावरील डोंगराच्या बाजूचा भराव पावसाने वाहून गेल्याने रस्ता खचला आहे. केबल टाकायला रस्ता उकरलेला होता. पावसात त्यावरील माती वाहून गेल्यामुळे रस्ता खचला आहे. रात्रीअपरात्री वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास एखादा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खचलेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भोर-महाड हा कोकणात जाणारा एकमेव मार्ग असल्याने आणि डोंगरातून येणारे धबधबे सुरू झाल्याने भिजण्याचा आनंद घेण्यासाठी स्थानिक नागरिकांसह अनेक पर्यटक या मार्गाचा वापर करतात. मात्र, या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब असून सतत दरडी पडतात. यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे.

भोर तालुक्यातून जाणाऱ्या भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावर एक महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. परखंदेवाडी ते निरगुडसर दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. पहिल्याच पावसात ही अवस्था असून, अजून तीन महिने असणाऱ्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था कशी होईल, असा प्रश्न प्रवासी व पर्यटक विचारत आहेत.

नीरा देवघर धरण, वरंधा घाट, निसर्गरम्य वातावरण, धबधबे यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या मार्गाचा वापर करतात. मागील महिन्यात भर पावसाळ्यात रस्त्याचे कारपेट व शिलकोट करण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे परंदेवाडी ते निरगुडसर दरम्यानच्या नवीन रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत.

रस्त्यावर सर्वत्रच पाणी साचत असल्याने खड्डे पडत आहेत. वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. लाखो रुपये खर्च करून निकृष्ट कामांमुळे पुन्हा एकदा रस्ता खड्ड्यात गेल्याने प्रवासी व पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. तेव्हा वरंधा घाटातून जाताना सावधगिरी बाळगा नाही तर थेट दरीत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात