‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं, ‘कोरोना’ काळात घरगुती उपयांनी फुफ्फुसांना ठेवा निरोगी

पोलिसनामा ऑनलाइन – फुफ्फुसं आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग यांचा जवळचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर फुफ्फुसं निरोगी असणे खुप गरजेचे आहे. फुफ्फुसांना इतर समस्यांही होऊ शकतात. यासाठी काळजी घेतली पाहिजे. तुमची फुफ्फुसं खराब झाली असल्यास काही लक्षणं दिसून येतात, ती वेळीच ओळखली तर योग्य तो उपचार करता येतो. फुफ्फुसं खराब होण्याची कोणती लक्षणं आहेत आणि फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेवूयात…

ही आहेत लक्षणं
1 अचानक छातीत दुखणे
2 श्वास घ्यायला त्रास होणे
3 सुका खोकला
4 चक्कर येणं

फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी हा उपाय करा

1. फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी 1 लीटर पाणी, 400 ग्रॅम कापलेला कांदा, 5 चमचे मध, 2 चमचे हळद आणि 1 चमचा कापलेलं आलं हे साहित्य घ्या. प्रथम पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यानंतर कांदा, आलं आणि हळद घालून मिक्स करा. कमी आचेवर पाणी उकळवा. अर्ध्यापेक्षा कमी झाल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर मध घाला आणि एखाद्या भांड्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. हा काढा रोज सकाळी आणि संध्याकाळी 2-2 चमचे प्या. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर हे सिरप पिऊ शकता

2. सिगारेट ओढणं बंद करा. कोणतीही वैद्यकीय ट्रिटमेंट सुरू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वरील काढा घ्या.