पुण्यात सहकाऱ्याकडून लग्नाच्या अमिषाने IT कंपनीतील तरुणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाचे अमिष दाखवून एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यानेच तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर त्याने दिलेल्या मानसिक त्रासामुळे तिने फिनाईल पिले तेव्हा तरुणाने रुग्णालयात तिचे खोटे नाव नोंदवून पोलिसांना खोटा जबाब देण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित नंदकिशोर जोशी (वय. २४, मोरेबाग कात्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पिडीत तरुणी व अमित जोशी एकाच कंपनीत नोकरी करतात. दरम्यान तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर जोशी याने तिला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीला त्याने वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने ४ एप्रिल रोजी फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयात तिचे खोटे नाव नोंदवले. त्यानंतर पोलिसांनाही खोटा जबाब नोंदवून घेण्यासाठी दडपण आणले आणि लग्न न करता तिची फसवणूक केली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.

You might also like