Collector Dr. Rajesh Deshmukh | अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्ते अपघाताच्या (Road Accident) अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस (Pune Police) तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी. याद्वारे कार्यक्षेत्रात झालेल्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यातील अपघात टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत (Road Safety Committee Meeting) जिल्हाधिकारी डॉ. देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) बोलत होते.

 

यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे (RTO Dr. Ajit Shinde), पुणे शहरचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहूल श्रीरामे (Traffic DCP Rahul Shrirame) आदी उपस्थित होते.

 

बैठकीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) तसेच पुणे शहर (Pune City) तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police Commissionerate) हद्दीत गेल्या वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय (NHAI), एमएसआरडीसी (MSRDC), सार्वजनिक बांधकाम-राष्ट्रीय महामार्ग विभाग (Public Works-National Highway Department), पुणे (PMC) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हद्दीतील धोकादायक अपघात ठिकाणांबाबतचा (ब्लॅकस्पॉट) आढावा घेऊन केलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी अपघात नोंदणी व विश्लेषण प्रणालीबाबत (आयरॅड) सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख त्यावर म्हणाले, ‘आयरॅड’ प्रणालीवर प्रत्येक अपघाताची नोंद होणे अपघातस्थळाची सर्वंकष माहिती होण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातून संबंधित ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करता येऊन भविष्यातील अपघातानांना आळा घातला जाऊ शकतो. या ॲपद्वारे माहिती भरणे बंधनकारक असून सर्व संबंधित विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन याची काटेकोर अंमलबजावणी करावी. ‘आयरॅड’वर खासगी रुग्णालयांनी अपघातातील रुग्णांची माहिती भरण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात.

 

संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi) राष्ट्रीय महामार्गाबाबतच्या (National Highway)
अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील ग्रामस्थांच्या समस्यांसंदर्भात एनएचएआयचे कार्यकारी
अभियंता तसेच ग्रामस्थांचे म्हणणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख तसेच समिती सदस्यांनी ऐकून घेतले.
या ठिकाणी एनएचएआयने त्यांचे रस्ता सुरक्षा सल्लागार, पोलीस विभाग, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा
संयुक्त पाहणी करुन त्याचा अहवाल द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले.

 

पुणे ग्रामीण पोलीसांना देणार दोन स्पीडगन
ग्रामीण पोलीस वाहतूक विभागाच्या (Rural Police Traffic Department) मागणीनुसार रस्ता सुरक्षा निधीतून
वाहनांचा वेग मोजण्यासाठी 2 स्पीडगन (Speed Gun) लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीस पीएमआरडीए, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल,
आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग, शिक्षण, एसटी महामंडळ, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Collector Dr. Rajesh Deshmukh The causes of accidents should be found and emphasis should be placed on measures – District Magistrate Dr. Rajesh Deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gyanvapi Mosque Case | ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

 

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

 

Post Office | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, 100 रुपयांपासून करा सुरुवात, असे मिळतील 16 लाख