जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधानभवन परिसरात निर्बंध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करणे तसेच छाननी या प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधानभवन परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरात निर्बधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या लोकसभा मतदार संघातील उमेदवार निवडणूकीचे अर्ज दाखल करतात. पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार विधान भवन(कौन्सिल हॉल) येथे अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करणे आणि त्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधान भवन परिसरात २८ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत २०० मीटर अंतरापर्यंत निर्बंध घाण्यात आले आहेत. असे बोडखे यांनी सांगितले आहे.

  • या परिसरात अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराबरोबर ४ पदाधिकारी किंवा सुचक कार्यकर्ते यांच्या ऐवजी कोणालाही प्रवेश करता येणार नाही.
  • जिल्हाधिकारी व विधान भवन परिसरात सभा घेणे, प्रचार करणे यास मनाई करण्यात आली आहे. परिसरात कोणत्याही प्रकारचा छापील मजकूर चिकटवण्य़ास मनाई करण्यात आली आहे.
  • त्यासोबतच निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापासून १०० मीटर अंतराच्या आत फक्त ३ वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
  • जिल्हाधिकारी कार्यालय व विधान भवन परिसरात भादंवि कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारयदेशीर कारवाई करण्यात येईल.