काय सांगता ! होय, ‘या’ कारणामुळं चक्क जिल्हाधिकार्‍यांनी देवीला पाजलें ‘मद्य’, ‘हंडी’ सोबत घेत नगरप्रदक्षिणा घातली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भगवान महाकालाचे नगर असलेल्या उज्जैनमध्ये नवरात्रीदरम्यान, महाष्टमीच्या दिवशी देवीला मद्याचा प्रसाद अर्पण केला जातो. प्रसिद्ध राजे विक्रमादित्य हे महालया आणि महामाया मातेची पूजा करत असत, तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे, असे सांगितले जाते. आजीही ही परंपरा कायम असून सध्या जिल्हाधिकारी हा विधी पार पाडतात. मंगळवारी महाअष्टमीनिमित्त २४ खंभा माता मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

परंपरेनुसार उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी महालया आणि महामाया मातेला मद्याचा प्रसाद अर्पण करून महामारीतून सर्वांची मुक्तता करण्याची प्रार्थना केली. विशेष म्हणजे देवीला प्रसाद अर्पण केल्यानंतर २७ किमीपर्यंत मद्याची धार वाहून विविध भैरव मंदिरांमध्ये मद्याचा प्रसाद अर्पण केला. यादरम्यान काही अंतरापर्यंत मद्याची हंडी घेऊन जिल्हाधिकारी पायी चालले.

येथे अनेक ठिकाणी देवीची प्राचीन मंदिरे आहेत. नवरात्रौत्सवात इथे विशेष पूजापाठ केला जातो. या मांदिरांमध्ये २४ खंबा माता मंदिराचाही समावेश आहे. आख्यायिकेनुसार २४ खांबापासून भगवान महाकालेश्वर मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठीचा मार्ग बनवण्यात आला होता. या द्वाराच्या दोन्ही बाजूंना महामाया आणि महालया मातेच्या प्रतिमा स्थापित आहेत. या दोन्ही देवींची आराधना सम्राट विक्रमादित्य हे करत असत.

अष्टमीच्या दिवशी शासकीय पूजा करण्याची परंपरा त्यांच्याच काळापासून सुरू आहे. उज्जैन नगररक्षणासाठी २४ खांब स्थापित करण्यात आलेले आहेत. महाष्टमीदिवशी देवीने शहराचे तसेच महामारीपासून रक्षण करावे यासाठी इथे शासकीय पूजा आणि त्यानंतर पायी नगर पूजा केली जाते. ही महापूजा २७ किमी लांब असून ४० मंदिरांमध्ये मद्याचा प्रसाद अर्पण केला जातो. सकाळी सुरु झालेला हा विषयी सायंकाळी समाप्त होतो. २४ खंबा माता मंदिरापासून यात्रा सुरू होऊन ज्योर्तिलिंग महाकालेश्वराच्या मंदिराच्या शिखरावर ध्वज चढवून यात्रेची समाप्ती होते. या यात्रेचे खास वैशिष्टय आहे. एका मडक्यामध्ये मद्य भरून मडक्याच्या खाली छिद्र केले जाते. त्या शिद्रामधून शहरामध्ये संपूर्ण २७ किमीपर्यंत मद्याची धार वाहिली जाते. विशेष म्हणजे ही धार तुटली जाऊ नये याची काळजी घेतली जाते.