डॉ. चौगुले दांम्पत्याचे सनद रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार : जिल्हाधिकारी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली येथील  चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये झालेल्या बेकायदा गर्भपातप्रकरणातील संशयित डॉ. रुपाली चौगुले आणि डॉ. विजयकुमार चौगुले यांना अटक करून शासकीय सेवेतून निलंबीत केले आहे. त्यांची सनद रद्द होण्यासाठी इंडीयन मेडिकल कॉन्सिलकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना दिली.
[amazon_link asins=’B0756RF9KY,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9318f1c2-ba9c-11e8-a18b-7f0baa4d7813′]

गर्भपात प्रकरणाची  गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी  पाटील यांनी आज विविध विभागाची तातडीने बैठक घेतली. या बैठकीस आयुक्त रविंद्र खेबुडकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत,  वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, महापालिका आरोग्य अधिकारी एस. आर. कवठेकर, उपअधिष्ठाता डॉ. नंदिनी गायकवाड आदि उपस्थित होते. या प्रकरणाचा आढावा घेऊन संबंधीतांना त्यांनी सूचना दिल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,  हे दोघेही डॉक्टर शासकीय अधिकारी म्हणून सेवेत होते. त्यामुळे  त्यांच्यावरील कारवाईसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठवला आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोग्य विभागाकडून याबाबत  तात्काळ निलंबनाची कारवाई होईल.  या  हॉस्पिटलचा परवाना रद्द केला आहे. डॉ. रूपाली चौगुले यांना अटक केली असून लवकरच डॉ. विजयकुमार चौगुले यांच्या अटकेची कारवाई होईल.  या प्रकरणात  कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून हे प्रकरण न्यायालयात सक्षमपणे मांडले जाणार आहे. हे दोघेही शासकीय सेवेत कार्यरत असल्याने त्यांच्यावरील विभागीय चौकशीचा प्रस्ताव महापालिका सादर करणार आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a1aebe4-ba9c-11e8-a359-7df7996d79d5′]

आयुक्त  खेबुडकर म्हणाले, तीन महिन्याला सर्व सोनोग्राफी सेंटर व हॉस्पिटलची कायद्यातील तरतुदीनुसार काटेकोर तपासणी होईल. यापुढे अशी प्रकरणे होवू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी 10 पथके तयार करण्यात आली आहेत.

प्रत्येक तालुक्यात हॉस्पिटल तपासणीसाठी एक पथक तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून अशा प्रकरणाची छाननी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले डॉ. साळुंखे म्हणाले, डॉ. रुपाली चौगुले या 14 मे 2018 रोजी भिवघाट येथे रुजू झाल्या. त्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्या रजेवर आहेत. त्यांचा रजा अर्ज नामंजूर करून अनेकवेळा नोटीसा देण्यात आल्या आहेत.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a07c118d-ba9c-11e8-a5a4-8bc8ece4be93′]

उपअधिक्षक वीरकर म्हणाले, लिंग निदान चाचणी करून स्त्री गर्भपातासाठी शस्त्रक्रिया झाल्याचे अद्याप निष्पन्न झाले नसून त्या दृष्टीनेही तपास चालू आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी