जिल्हाधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय, कास्ट्राईबचा आरोप

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी मागासवर्गीय कर्मचारी कल्याण महासंघाच्या मागील ६ महिन्यापासून सभा आयोजित केलेल्या नाहीत. जिल्हाधिकारी यांनी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने वारंवार पत्र देवून सुद्धा सभा आयोजित करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. परंतु भंडारा जिल्हा येथे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांचेकडून उदासीनता दाखविण्यात आलेली आहे.

मागील ६ महिन्यापासून थोर महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी जिल्हाधिकारी यांना आमंत्रित करून सुद्धा कार्यक्रमाला तारीख व वेळ देतात मात्र मागील ६ महिन्यापासून मुळीच उपस्थित नाहीत, तर मग वेळ व तारीख का म्हणून द्यावी. यावरून जिल्ह्यातील लोकांची फार मोठी घोर निराशा झालेली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात नवोदय विद्यालयाचा ४० ते ५० दिवस मंडप असून सुद्धा तसेच इतरही मंडप असून त्यांना पाचारण केले जात नाही व भेट सुद्ध दिली जात नाही.

जिल्ह्यातील काही लोक जिल्हाधिकारी यांना भेटण्याकरिता गेले असता अप्पर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी यांना भेटा असे बोलतात. जिल्हाधिकारी यांच्यावर जिल्ह्यातील लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचा आरोप कास्ट्राईब संघटनेने लावला आहे.

कर्मचारी कपातीच्या धोरणाविरुद्ध मागासवर्गीय कर्मचारी संघटना आक्रमक