बीड : गरिबीनं तिला शिकू दिलं नाही, पोलिसांनी अन् डॉक्टरांनी वाचवलं नाही, गेला पोरीचा जीव

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने अहमदनगर येथील आर्मी कॉलेजमध्ये क्लासेस लावण्यासाठी पैसे नसल्याने विष प्राशन केले. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. सारीका दादासाहेब शिंदे (वय-18 रा. कोळगाव ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे.

सारीका शिंदे ही चलकंबा येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत 12 च्या वर्षात शिकत होती. सारिकाला अहमदनगर येथील आर्मी कॉलेजमध्ये क्लास लावायचे होते. मात्र, घरची परिस्थीती हलाकीची असल्याने तिच्या घरच्यांनी क्लासचे पैसे भरले नाहीत. त्यामुळे ती निराश झाली होती. याच नैराश्येतून तिने आज सकाळी राहत्या घरी साडेनऊच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. घरच्यांना हा प्रकार समजताच तिला गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सारिकाने विषारी औषध घेतल्यानंतर दहाच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल करण्यात आले परंतु सारीकाची प्रकृती जास्त खराब झाली. तिला उपचार कामी जिल्हा रुग्णालय बीड येथे आणत असताना साठे चौकातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्ण घेऊन येत असलेल्या गाडीला अडवले.

सात-आठ मिनिटे गाडीची तपासणी करत असताना तिच्या नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले आमच्या गाडीमध्ये अतिगंभीर रूग्ण आहे. आम्हाला जाऊ द्या परंतु कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही, असा आरोप सारीकाच्या वडीलांनी केला आहे. जिल्हा रुग्णालय बीड येथे सारीकाला दाखल करण्यात आले परंतु डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे सारीकाचा मृत्यू झाला, असा आरोप ही सारिकाच्या वडीलांनी केला आहे. वेळेत डॉक्टर उपलब्ध न झाल्याने सारीकाचा दुपारी साडेबाराच्या सुमरास मृत्यू झाला.

Visit : Policenama.com