खळबळजनक ! पुण्यात अपहरण करुन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – निगडी येथील वर्दळीच्या चौकात तोंडावर गुंगीचे औषध फवारुन, तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्‍तींवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास तरुणी निगडीतील टिळक चौक परिसरातून कॉलेजला निघाली होती. त्यावेळी तीन जणांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारून तोंडावर रूमाल लावला आणि रिक्षात बसवले. त्यानंतर अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्यावर करण्यात आला. अत्याचार केल्यानंतर एका ठिकाणी फुटपाथवरसोडण्यात आले.

फुटपाथवर तरुणी रडत असल्याने नागरिकांनी पाहिले. तिच्याशी विचारपूस केली असता तिने हा प्रकार सांगितला. नागरिकांनी तिला निगडी येथे सोडले. चक्कर येत असल्याने ती दवाखन्यात गेली, त्यावेळी डॉक्टरांनाही तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे आणि रिक्षाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तपास निगडी पोलिस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like