College of Engineering Pune | गरजु विद्यार्थ्यांसाठी अवघ्या दोन तासांत तब्बल 10 लाख रुपयांचा निधी जमा; सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशनच्या वतीने सुरु केलेल्या ‘स्टुडंट सपोर्ट क्लब’ उपक्रमास भरघोस प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) (College of Engineering Pune) मधील कोणताही विद्यार्थी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून, अन्नापासून, शिक्षण साहित्यापासून वंचित राहू नये म्हणून सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशनच्या (Alumni Association) वतीने गरजु विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट सपोर्ट क्लब’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशन आणि सीओईपी सीएक्सओ क्लब तर्फे आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ वितरण सोहळ्यात या अभिनव उपक्रमाची घोषणा करण्यात आली. ऑनलाईन झालेल्या दोन तासाच्या या कार्यक्रमातच या उपक्रमासाठी तब्बल 10 लाख रुपयांचा निधी जमा झाला. आणि माजी विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास आता मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

सीओईपी अ‍ॅल्युमनी असोसिएशन आणि सीओईपी सीएक्सओ क्लब तर्फे 2019-20 आणि 2020-21 या वर्षासाठीच्या ‘सीओईपी अभिमान पुरस्कारा’चे (COEP Pride Award) ऑनलाईन कार्यक्रमात वितरण झाले.
भारतीय नौदलातील रिअर अडमिरल आशिष कुलकर्णी (1987 बॅच), महाराष्ट्र सरकारचे (Government of Maharashtra) प्रधान सचिव विकास खरगे (1989 बॅच), अम्फोनल इंडियाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट जॉन (1980 बॅच), आयएसबी हैदराबादचे उपअधिष्ठाता मिलिंद सोहोनी (1990 बॅच), एमआयटी अमेरिकाचे सहाय्यक प्राध्यापक रमेश रासकर (1991 बॅच) यांना 2020-21 साठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर, 2019-20 साठी भारतातील पहिल्या सेल मशिनचे डिझाईनर एच ई गोडबोले (1965 बॅच),
पुणे मेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये (1971 बॅच),
प्राप्ती कर खात्याचे अतिरिक्त संचालक संदीपकुमार साळुंखे (1998 बॅच) आणि जिओसॅटचे प्रोग्रॅम संचालक व्ही आर कट्टी (1969 बॅच) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे पुरस्काराचे झाले नसल्याने आणि यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन्ही वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा एकत्रितच ऑनलाईन पार पडला.

याप्रसंगी सीओईपीचे 1995 च्या बॅचचे विद्यार्थी आणि प्रसिद्ध लेखक,
जीवनशैलीचे मार्गदर्शक गौर गोपाल दास यांनी जीवनातील आनंद, नाती आणि जीवनाचा हेतू याविषयी मार्गदर्शन केले.
या सन्मान सोहळ्यास सीओईपीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक डॉ. बी. बी. अहुजा,
सीओईपी अॅल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष भरत गिते,
सचिव सुजित परदेशी, खजिनदार अंकिता चोरडिया, सदस्य प्रा. एस. डी. आगाशे,
नियुक्त सदस्य मोहित गुंदेचा व अनुप साबळे आदी मान्यवर आणि एक हजारांहून अधिक माजी विद्यार्थी देश-विदेशातून उपस्थित होते.

यावेळी सीओईपीच्या वाटचालीबद्दल आणि व्हिजनबद्दल प्रतापराव पवार यांनी माहिती दिली.
डॉ. बी बी अहुजा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. डी. आगाशे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरुची वाघ यांनी केले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- College of Engineering Pune | Funds of Rs 10 lakh for needy students in just two hours; Great response to the ‘Student Support Club’ initiative launched by the COEP Alumni Association

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती