‘सेकंड हॅन्ड’ सोफा खरेदी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘कव्हर’ काढलं, आतमध्ये सापडलेलं ‘घबाड’ पाहून झाले ‘थक्‍क’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जेव्हा एखादी वस्तू आपण खरेदी करतो त्यावेळी ती पारखून आणि योग्य असल्याचे पाहूनच खरेदी करतो. मात्र काही वेळा खरेदी केलेल्या वस्तूमध्ये असे काही निघते की ते पाहिल्यानंतर आपल्या पायाखालची जमीन सरकते. असाच एक प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांनी राहण्यासाठी एक घर भाड्याने घेतले होते. घरात बसण्यासाठी त्यांनी एक जुना सोफा खरेदी केला होता. जेव्हा सोफ्याचे कव्हर विद्यार्थ्यांनी फाडले त्यावेळी त्यांच्या डोळ्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.

अमेरिकेतील पाल्टज येथे हा प्रकार घडला आहे. स्टेट युनिव्हर्सीटीमध्ये शिकणारे रीसे वेरखोवे, कॉली गास्टी आणि लारा रुस्सो या तीन विद्यार्थ्यांनी भाड्याने एक घर घतले होते. त्यानंतर त्यांनी घरामध्ये आवश्यक असणाऱ्या सामानाची खरेदी केली. यामध्ये त्यांनी एक जुना सोफा १३०० रुपयांना खरेदी केला. काही दिवासांनी सोफ्यावर बसून ते टीव्ही बघत होते. त्यावेळी त्यांना सोफ्यामध्ये काहीतरी असल्याचे जाणवले.

त्या तिघांनी सोफ्यावरील कव्हर काढले त्यावेळी त्यांनी असे काही पाहिले कि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना एक पाकीट सापडले. या पाकिटात पैसे होते. विद्यार्थ्यांनी सगळा सोफा उचकटून पाहिला असता त्यांमध्ये आणखी काही पाकीटे त्यांना दिसली. पाकीटे उघडून पाहिली असता त्यामध्ये तब्बल ४१ हजार डॉलर म्हणेजच २९ लाख रुपये मिळाले. या पाकीटासोबत त्यांना बँकेत पैसे भरण्याची स्लीप सापडली.

सापडलेल्या बँकेच्या स्लीपवर नाव होते. विद्यार्थ्यांनी हे पैसे ज्यांचे आहेत त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी लगेच बँकेत जाऊन स्लीपवरील नाव असलेल्या व्यक्तीचा पत्ता घेतला. मिळालेल्या पत्त्यावरू त्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्यांना त्या पत्यावर एक वृद्ध महिला मिळाली. ज्यावेळी त्यांनी हा प्रकार त्या महिलेला सांगितला. तेव्हा त्या महिलेने हे पैसे त्यांच्या वडिलांचे आहेत. त्यांनी ते पैसे बँकेत जमा करण्यासाठी ठेवले होते. त्यांना हे पैसे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळाले होते. मुलांनी सापडलेले सर्व पैसे प्रामाणिकपणे त्या वृद्ध महिलेच्या स्वाधीन केले.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like