कागलमध्ये तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

कागल : पोलीसनामा ऑनलाईन – नैराश्यातून एका महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कागल शहरातील आंबेडकरनगरमध्ये शनिवारी (दि. 30) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ओंकार संजय घस्ते (वय 21) असे या तरुणाचे नाव आहे. घरात कोणी नसल्याचे पाहून ओंकारने छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मृत ओंकार घस्ते हा शहरातील एका महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत होता. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.