Colleges Reopen In Maharashtra | राज्यभरातील महाविद्यालये आजपासून खुली; 50 % पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Colleges Reopen in Maharashtra | मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद असलेले काॅलेज महाविद्यालये आजपासून खुली होणार आहेत. कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. याचा विचार करता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु (Colleges Reopen In Maharashtra) करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आजपासून म्हणजे 20 आक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार आहेत.

कोरोना विषाणूने राज्यात नाहीतर देशात लाॅकडाऊन लागलं. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाला. या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालयाला (Colleges Reopen In Maharashtra) देखील कुलुप लागलं. यानंतर शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यात आलं. कोरोनाची परिस्थितीही आटोक्यात आल्याने शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्याचे लक्ष लागून होते. मात्र अखेर काॅलेजची घंटा वाजली आहे. दरम्यान, कोरोनाची अजुनही काहींच्या मनात असणारी भीती आणि पालकांची संमती पाहाता आता विद्यार्थ्याची उपस्थिती किती असणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने महाविद्यालये सुरू करण्यासाठी कोरोनासंदर्भात काही नियमने (Corona rules) घालुन दिली आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक (corona vaccine) लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. तसेच, 50 टक्के पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू केले जाणार आहेत.

त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
मुख्य म्हणजे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी कोरोनाचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालयं सुरु करायची आहेत.
अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा

Pune News | ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’; पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे नामकरण, शिवसेनेने केले अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Colleges Reopens In Maharashtra | maharashtra colleges to reopen from today october 20 mask must for all 50% students

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update