Colombo Serial Blast : विमानतळावर घातपात टळला, २४ जणांना अटक

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेची राजधानी कोलंबोत ईस्टर संडेच्या दिवशी आठ बॉम्बस्फोटांच्या मालिकेतील मृतांचा आकडा आता २९० वर गेला आहे. परंतु त्यानंतर कोलंबो मुख्य विमानतळाजवळ एक पाईप बॉम्ब आढळून आला. तो वेळेत निष्क्रीय करण्यात आल्याने मोठा धोका टळला. याप्रकरणी २४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोलंबो विमानतळाच्या मुख्य टर्मिनलजवळील रस्त्याच्या बाजूला रविवारी हाताने तयार करण्यात आलेला पाईप बॉम्ब आढळून आला. त्यानंतर बॉम्बनाशक पथकाने मोठ्या सुरक्षा व्यवस्थेसह तो बॉम्ब निकामी केला. साखळी बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेला आईडीदेखील स्थानिक ठिकाणीच तयार करण्यात आला असल्याचे श्रीलंका हवाई दलाचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन गिहान सेनेविरल्रे यांनी सांगितले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like