सियाचीनवर तिरंगा फडकावरणारे कर्नल नरेंद्र ‘बुल’ यांचं निधन, लष्करानं आणि PM मोदींनी वाहिली श्रध्दांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात उंच भाग असलेल्या सियाचिन ग्लेशिअरवर भारताची स्थिती मजबूत करत तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र ‘बुल’ कुमार (वय 87) यांचे गुरूवारी (दि.31) निधन झाले. याबाबत लष्करांकडून माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराने नरेंद्र बुल यांना श्रद्धांजली वाहिली. 1984 मध्ये ऑपरेसन मेघदूतच्या वेळी त्यांनी अनेक मोहिमा पार पाडल्या होत्या. तसेच सियाचिनमधील पाकिस्तानच्या कुरापती रोखण्याचे मोठ कामही त्यांनी केले होते.

कर्नल नरेंद्र कुमार यांच्या जन्म 1933 मध्ये ब्रिटीशकालिन भारतील रावलपिंडी (सध्या पाकिस्तानात) येथे झाला होता. 1950 मध्ये ते भारतीय लष्करात दाखल झाले. तसंच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कुमाऊं रेजिमेंटमध्ये रूजू झाले. भारतीय लष्करात ते ‘कुमार बुल’ या नावाने प्रसिद्ध होते. सियाचीनवरील महत्त्वाच्या लष्करी ठाण्याला ‘कुमार बेस’ असं नाव देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे. 34 वर्षांच्या लष्करी सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यांना पद्मश्री, कीर्तिचक्र, अतिविशिष्ट सेवा पदक, तसेच अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी सर्वात उंच समजलं जाणाऱ्या नंदादेवी शिखरावर तिरंगा फडकावला होता.