लघवीच्या रंगावरून समजेल कॅन्सर आहे किंवा नाही ! निळा रंग झाल्यास असेल ‘हा’ कॅन्सर

पोलिसनामा ऑनलाइन – कॅन्सर हा असा एक गंभीर आजार आहे ज्याचं उशीरा निदान होत असल्यानं अनेकदा वेळेत उपचार घेणं शक्य होत नाही. अशात अनेकांना या आजारात जीव गमवावा लागतो. कॅन्सर झाला आहे किंवा नाही हे माहित करून घेण्यासाठी अनेक टेस्ट केल्या जातात. मात्र या टेस्टचा रिपोर्ट येण्यास उशीर लागतो. अशात आता यात आणखी एका टेस्टची भर पडली आहे. आता युरिन टेस्टच्या माध्यमातून कॅन्सरची माहिती मिळवणं शक्य होणार आहे.

मॅचाच्युसेट्स इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी युरिनच्या रंगावरून कॅन्सरची माहिती मिळवण्याचा प्रयोग केला आहे. उंदरांवर हा प्रयोग करण्यात आला होता. संशोधकांनुसार टेस्टदरम्यान युरीनचा रंग निळा होत असेल तर हा कोलोन कॅन्सर असल्याचं स्पष्ट होतं. असा दावा केला जात आहे की, टेस्टची पद्धत फारच स्वस्त आहे जी सामान्य लोकही सहज करू शकतील.

1 तासात मिळणार रिपोर्ट

रिसर्चबद्दल बोलायचं झालं तर हा रिसर्च मॅसाच्युसेट्स ऑफ टेक्नॉलॉजी आणि लंडनच्या इंपेरियल कॉलेजनं एकत्र मिळून केला आहे. संशोधक सांगतात की, युरिन टेस्टच्या माध्यमातून कॅन्सरची माहिती मिळवली जाऊ शकते. नेचर नॅनोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, या टेस्टसाठी लॅबमध्ये फार साधन सामग्रींची देखील गरज पडणार नाही. म्हणून टेस्टची ही पद्धत खूप सोपी आहे.

प्राध्यापक मॉली म्हणाले की, “टेस्टदरम्यान युरिनमध्ये रसायनांच्या क्रिया प्रतिक्रियेने याचा रंग बदलतो. याच्याच मदतीनं कॅन्सरची माहिती मिळू शकते. हा रिसर्च 28 उंदरांवर करण्यात आला होता. यातील 14 उंदरं कॅन्सरनं पीडित होते आणि 14 सामान्य होते. सॅम्पल घेतल्यावर अर्ध्या तासाच्या आतच टेस्ट करणं शक्य झालं. संशोधकांनी याला कलरिमेट्रीक युरिनरी असं नाव दिलं आहे.

संशोधकांनुसार, या टेस्टच्या मदतीनं अनेक प्रकारचे कॅन्सर आणि इतरही दुसऱ्या आजारांची माहिती मिळवता येणं शक्य होणार आहे. टेस्ट अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे आणि आणखी चांगली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या कॅन्सरची टेस्ट करण्यासाठी एमआरआय स्कॅन आणि ब्लड टेस्ट केली जाते या टेस्टचा रिपोर्ट येण्यास वेळ लागतो. परंतु युरिन टेस्टचा रिपोर्ट मात्र 1 तसातच मिळतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.