‘काकडी’ अन् ‘टोमॅटो’ एकत्र खाल्ल्यानं होऊ शकतं मोठं नुकसान ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकांना काकडी आणि टोमॅटो खूप आवडतं. परंतु जेवताना ते अनेकदा एकत्रच याचं सेवन करतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का याचं एकत्र सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. याचं काय कारण आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात.

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्यानं गॅस, ब्लोटींग, पोटदुखी, मळमळ, थकवा अपचन अशा अनेक समस्या येऊ शकतात. असं का होतं हेही आपण जाणून घेऊयात.

असं का होतं ?

एक्सपर्ट सांगतात की, काकडी आणि टोमॅटो दोन्ही विरूद्ध यादीत येतात. याचाच अर्थ असाय की, काकडी आणि टोमॅटो एकमेकांच्या विरूद्ध आहेत. पोटात पचन होण्यासाठीचा दोन्ही फळांचा वेळही वेगवेगळा आहे. म्हणून हे दोन्ही पदार्थ पोटात एकाच वेळी गेले तर अनेक समस्या येऊ शकतात.

काकडी आणि टोमॅटो दोन्ही विरूद्ध असल्यानं एकाचं पचन लवकर होतं तर एकाचं हळूहळू होतं. म्हणूनच जर दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर समस्या येतात. कारण एक फळ आधी पचून ते इंटेस्टाईनमध्ये पोहोचतं तर दुसऱ्याची पचनक्रिया सुरू राहते. परिणामी शरीरात तणाव जाणवू लागतो. पोटासोबत शरीरासाठी देखील हे नुकसानदायी ठरू शकतं. म्हणून यांचं एकत्र सेवन टाळायला हवं. अन्यथा तुम्हाला विविध समस्या जाणवू शकतात.