जतमधील पारधी तांडयावर पोलिसांचे कॉबिंग ऑपरेशन; दोघेजण ताब्यात

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सातारा रोड आणि उमराणी रोड येथे वास्तव्य करून असलेल्या पारधी समाजाच्या तांड्यावर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास कॉबिंग ऑपरेशन राबविले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून उमराणी तांड्यामधून जिलेटीनच्या कांडया, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे . तसेच सहा संशयित मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत .

[amazon_link asins=’B0756RF9KY,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0515a99f-a9c4-11e8-9b62-e1aa614b9e46′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटे पारधी तांड्यावर पोलिसांची कोबिंग ऑपरेशन राबले या दरम्यान उमराणी रोडवरील तांडयातील शिवाजी प्रल्हाद चव्हाण व संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाई दरम्यान शिवाजी चव्हाण आणि संतोष चव्हाण यांच्या घराची झडती घेतली असता, एका पोत्यात जिलेटीन कांडया, गॅस टाकी, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्कीचे केबल कट करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.तसेच उमराणी रोडवरील तांडयातच सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह कर्नाटकातील सहा मोटर सायकली मिळून आल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान , शहर आणि परिसरात घरफोडी , दुकानफोडीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे चोरट्यांना पकडणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी तसेच तपासासाठी जत पोलिसांनी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे पारधी तांडयावर अतिरिक्त फौजफाटा देत कोबिंग ऑपरेशन राबवण्याची परवानगी मागितली होती.

शनिवारी रात्री एकच्या सुमारास जत, उमदी, कवठेमहांकाळ येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सांगली येथील दोन आरसीपी प्लाटूनमधील कर्मचारी असे तीन पोलीस निरीक्षक, पाच सहाययक पोलीस निरीक्षक, एक महिला सहाययक पोलीस निरीक्षक व ९८ पोलीस कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी उमराणी व सातारा रोडवरील तांड्यावर कोबिंग ऑपरेशन सुरू केले. या ऑपरेशन दरम्यान सहा संशयित मोटारसायकली तांड्यात दिसून आल्या त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

जबरी चोरी करुन पळलेल्यास वर्षानंतर अटक