निगडीतील ओटास्कीम मध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे निगडीतील ओटा स्किम परिसरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करून सराईत ५६ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. यांच्यावर खुनी हल्ला, मारामारी, हत्यारे बाळगणे या सारखे गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे.

खंडणी विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, तसेच बारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी यांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन केले. शुक्रवारी पहाटे निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओटास्कीम परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

ओटा स्कीम परिसरातील १२९ गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या यादीतील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी ३०९ पोलीस आणि ५५ अधिकारी यांनी शुक्रवारी पहाटे ओटा स्किम परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी तब्बल ५६ गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केल्याने शहरातील गुन्हेगारांची एकच पळापळ सुरू झाली आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारे सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like