home page top 1

कोंबींग ऑपरेशन : 54 हिस्ट्रीशीटरची झाडाझडती

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे 18 पोलीस ठाणे स्तरावर कोंबींग ऑपरेशन आयोजीत केले. यामध्ये पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे-फरारी आरोपी, हिस्ट्रीशीटर, माहितगार गुन्हेगार, अपराधसिध्द झालेले आरोपी, जामीनपात्र/अजामीनपात्र वॉरन्ट तसेच पोलीस ठाणे हद्दीत दाखल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दि. 23.09.2019 रोजी पहाटे 22.00 ते दि. 24.09.2019 रोजी 05.00 वा. चे दरम्यान मा. पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद श्री. राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 18 पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा (LCB), उस्मानाबाद येथील जास्तीत जास्त पोलीस अधिकारी/कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्या सहभागने कोंबींग ऑपरेशन करण्यात आले.

सदर ऑपरेशन दरम्यान एक पाहिजे आरोपी पकडण्यात आला, 58 अजामीनपात्र व 51 जामीनपात्र वॉरन्टची बजावणी करण्यात आली. तसेच 59 माहितगार गुन्हेगार, 54 हिस्ट्रीशीटर चेक करण्यात आले आहेत.

Visit : policenama.com

 

Loading...
You might also like