सुतारदऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन, तडीपारावर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोथरुडमधील सुतारदरा परिसरात कोथरुड पोलिसानी राबवविलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यावेळी परिसरातील २२ सराईतांची चौकशी करून पोलिसांनी तडीपारीच्या काळातही आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या एका तडीपार गुंडाला अटक केली.

समीर अशोक ढोकळे (२३, रा. सुतारदरा) असे त्याचे नाव आहे.

समीर ढोकळे हा परिसरातील सराईत गुंड आहे. त्याला परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त यांनी शहरातून ४ डिसेंबर २०१८ पासून तडीपार केले होते. पोलिसांनी ४ मार्च रोजी कोथरुड परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवविले. त्यावेळी २२ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान समीर ढोकळे हा तडीपारीच्या कालावधीत तो सुतारदरा परिसरात आढळून आला. त्यानंतर पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या सूचनेनुसार त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस पोलीस अधिनियमच्या कलम १४२ नुसार कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खटके, ३ पोलीस निरीक्षक, १५ कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

ह्याहि बातम्या वाचा

‘लष्कराच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी नको

भरधाव ट्रकची मोपेडला धडक, पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर

एसआरपीएफच्या गट क्र. १ ला पुणे महापालिकेचा स्वच्छ पुरस्कार

केंद्र सरकार जातीय भेद निर्माण करत आहेत : ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप