पहिल्या दिवशी मुलींच्या शाळेत सापडला ‘कंडोम’चा कचरा !

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळा परिसरात सोमवारी दोन पोते दारु च्या रिकाम्या बाटल्या आणि कंडोमचा कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्यानंतर १७ जून रोजी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून जवळपास ३५० पटसंख्या आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी शिक्षकांनी परिसरात स्वच्छता केली असता त्यांना दारुच्या बाटल्यांचा खच आणि कंडोमचा कचरा दिसून आला.

हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शाळेच्या परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळून आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. शाळेला सुरक्षा भिंत आहे. मात्र तिची उंची कमी असल्याने त्यावर चढून किंवा बाहेरुन परिसरात हा कचरा फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या शाळेजवळच भाजीमंडई व इतर गजबजलेला परिसर आहे. हा बाजार परिसर रात्री मोकळा असतो.

टारगट मुलांनी वा तळीरामांनी हा उपद्रव केला असावा, अशी शक्यता मुख्याध्यापकांनी वर्तविली असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने 

केस काळे ठेवण्यासाठी हे ‘प्राणायम’ करते मदत 

वजन कमी करण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ उपयुक्त

#YogaDay2019 : सौंदर्य आणि तारुण्य वाढविणारे नटराजन आसन