मतदारांनो ‘भयमुक्त’ मतदानासाठी बाहेर पडा : सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ विधानसभा मतदार संघातील ५६८ इमारतीत एकूण २ हजार ९२० मतदान केंद्रावर सोमवारी मतदान होत असून यावेळी शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी शहर पोलीस दलाचे साडेआठ हजार अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही मात्र, निवडणुक आयोगाच्या अन्य निकषानुसार पुण्यात ११० मतदान केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषित करण्यात आली आहेत या ठिकाणी शहर पोलीस दलाचा एक पोलीस उपनिरीक्षक अतिरिक्त देण्यात येणार असून तेथे केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त असणार आहे.

शहरातील बंदोबस्ताची माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली यावेळी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुकत मितेश गिट्टे उपस्थित होते. पुणे शहरात मतदानाच्या काळात ८ केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या तैनात करण्यात येणार आहे. या काळात १० पोलीस उपायक्त, १७ सहायक पोलीस आयुक्त, ७८ पोलीस निरीक्षक, ३६५ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, ४ हजार ४४८ कर्मचारी, १ हजार ८०८ होमगार्ड तसेच एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, १ हजार १०४ राखीव पोलीस, विशेष पथकात ७३० कर्मचारी यांचा समावेश आहे. वाहतूक नियमनासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

शहरातील बंदोबस्त

या बुथसाठी २२९८ पोलीस कर्मचारी व १८०८ होमगार्डस
४ पेक्षा अधिक बुथ असलेल्या इमारतींसाठी तसेच बाहेर १०० मीटरवर अतिरिक्त पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगकरीता
११० क्रिटीकल बुथ घोषित, प्रत्येक क्रिटीकल बुथसाठी १ अतिरिक्त होमगार्ड
संवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त
१३० इस्टंट रिस्पॉन्स टीम
१३० कायदा सुव्यवस्थेसाठी क्राईम रिस्पॉन्स टीम
१५ विभागीय रिस्पॉन्स टीम
१० पेक्षा अधिक बुथ असलेल्या ६८ इमारती
तेथे अतिरिक्त पोलीस बळ
३२ ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, एक अतिरिक्त पोलीस बळ
२२९ महसुल अधिकाऱ्यांबरोबर पोलीस दलाचा कर्मचारी
५ राईट कंट्रोल पॅटून

मतदानाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांच्या नेतृत्वाखाली ३० विशेष पथके स्थापन करण्यात आलेली आहेत.

 

visit : Policenama.com

स्त्रियांनी रक्तदान करावे का ? जाणून घ्या रक्तदानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती – 

‘नॉर्मल डिलिव्हरी’पेक्षा ‘सिझर’ अधिक सुरक्षित ! काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या – 

तुमच्या मुलास ‘मायक्रोन्युट्रिअंट डेफिशिअन्सी’ तर नाही ना ! अशी घ्या काळजी – 

‘फिटनेस’साठी सेवन करा ‘हे’ व्हिटॅमिनयुक्त पदार्थ, धावपळीतही रहाल तंदुरूस्त! – 

पिझ्झा, बर्गर, स्पाघेटीच्या अतिसेवनाने होऊ शकतो ‘अल्झायमर’, जाणून घ्या – 

‘व्हिटॅमिन ए’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो टीबी, डोळ्यांच्या समस्याही वाढतात –