सामाजिक एकोप्यासाठी एकत्र या, शरद पवार यांचे सर्वपक्षीयांना आवाहन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन

आज सामाजिक आणि धार्मिक एकोप्याची नितांत गरज असून यासाठी सर्व राजकीय मंडळींनी आपआपसातील मतभेद विसरून एकत्र यावे. धुळे एक कॉस्मोपॉलिटन शहर असल्याने याची सुरुवात येथूनच होऊ शकते, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते धुळे महानगरपालिकेच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान बोलत होते.

उपस्थितींशी संवाद साधताना पवार म्हणाले, धुळे हे तीन राष्ट्रीय महामार्गावर असलेले भारतातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचा फायदा धुळे शहर व जिल्ह्यासाठी कसा होईल, काही ध्येय-धोरणे, योजना आखता येतील का, यासाठी सर्वपक्षीय एकत्र या. माझा शब्द कुठे टाकायचा असल्यास मी त्यासाठी सदैव तयार आहे. धुळेसुद्धा एक कॉस्माेपॉलिटन शहर आहे. सामाजिक तसेच धार्मिक एकोपा नांदवण्यासाठी सगळे भेद दूर सारून एकत्र येण्याची सुरवात धुळे सारख्या शहरातून होऊ शकते. मी सगळ्या राजकीय मंडळींना एकत्र येण्याचे आव्हान करतो.  धुळ्याच्या विकासासाठी जर कुठे शब्द टाकायचा असल्यास मी त्यासाठी सदैव तयार आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
[amazon_link asins=’B079VHHR94′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f8a6f03-aebe-11e8-8a14-33bb574b6291′]

धुळे शहराने महात्मा गांधी, पंडितजी नेहरू, वि. दा. सावरकर, यंशवंतराव चव्हाण या थोर नेत्यांना मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्याच धुळ्याच्या महानगरपालिकेने आज मला मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यामुळे मी धुळेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. नूतन प्रशासकीय इमारतीच्या रूपाने शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी वास्तू धुळेकरांनी उभी केली आहे. १८६० साली स्थापन झालेल्या महानगरपालिकेने एवढा मोठा प्रवास करून नव्या वास्तूत प्रवेश केला. याचा आनंद होत आहे, असे पवार म्हणाले.