Drugs Case : कॉमेडियन भारतीपाठोपाठ तिच्या पतीला अटक, आज न्यायालयात करणार हजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली असून अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही कारवाई सुरुच आहे. ड्रग्स केस प्रकरणात शनिवारी एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईत कॉमेडियन भारती सिंह ( comedian Bharti Singh) हिच्या घराच्या घेतलेल्या झडतीत गांजा सापडल्यानंतर एनसीबीने तीला अटक केली आहे. तसेच तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यालाही एनसीबीने अटक केली आहे. दरम्यान, आज दोघांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष याने ड्रग्स घेतल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात आले. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) छापा टाकला होता कारवाईत तिच्या घरात गांजा सापडला होता. त्यानंतर भारती आणि तिच्या पतीला एनसीबीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. चौकशीनंतर भारतीला अटक केली होती. तर काही वेळाने तिच्या पतीलाही अटक केली आहे. भारती आणि हर्षच्या नोकरांकडेही चौकशी केली. दरम्यान, अटकेनंतर दोघांनाही रात्रभर एनसीबीच्या कार्यालयात ठेवण्यात आले. अटकेत असलेल्या भारतीला भेटण्यासाठी तिची आई आली होती. मात्र तिला भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. आता आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

You might also like