अंतराळात होणार ‘आतिशबाजी’, फक्त 36 तास बाकी…. दिसणार ‘अविस्मरणीय’ दृश्य

पोलीसनामा ऑनलाईन : अंतराळ खूप रहस्यमयी आहे. परंतु हे खरे आहे की तिथून आपल्याला बर्‍याचदा सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्ये पाहायला मिळतात. आत्ता, 24 ते 36 तासांनंतर आपल्याला पृथ्वीवरील आकाशातील आतिषबाजीचे दृश्य पाहायला मिळेल. जेव्हा आकाशातून चमकणारे धूमकेतू पृथ्वीच्या बाजूने येतील तेव्हा हे एक अतिशय सुंदर दृश्य असेल. आपण ते दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. हा नजारा मे महिन्यात दोनदा पाहायला मिळणार आहे. एक 13 मे रोजी पृथ्वीपासून सुमारे 8.33 कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल. कॉमेट स्वान असे त्याचे नाव आहे, सध्या ते पृथ्वीपासून सुमारे 850 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीवर वेगाने येत आहे. यानंतर, 23 मे रोजी, धूमकेतू अ‍ॅटलस पृथ्वीजवळून जाईल.

13 मे रोजी दिसणाऱ्या कॉमेंट म्हणजेच धूमकेतू स्वानचा शोध सुमारे एक महिन्यापूर्वी 11 एप्रिल रोजी मायकेल मॅटियाज्जो या अमॅच्युर अ‍ॅस्ट्रोनॉटने शोधला होता. तो नासाच्या सौर आणि हेलिओस्फेरिक ऑबझर्व्हेटरी (एसओएचओ) मधील डेटा पहात होता. त्यानंतर त्याने सोहो सोलर विंड एनिसोट्रोपीज इन्स्ट्रुमेंट (सोहो स्वान) मध्ये एक चित्र पाहिले. त्यांनतर त्याचे नाव स्वान ठेवले गेले. स्वान उपकरणाचा उपयोग सौर यंत्रणेत हायड्रोजन शोधण्यासाठी केला जातो. परंतु त्याच्या मदतीने मायकेलला स्वान धूमकेतू सापडला. आता हा धूमकेतू 13 मे रोजी पृथ्वीच्या जवळून जाईल. या धूमकेतूचे ट्विटर हँडल देखील आहे.

विषुववृत्तीय रेषेच्या दक्षिणेस राहणाऱ्यांनाच धूमकेतू स्वान पाहायला मिळणार आहे. आणि भारत विषुववृत्ताच्या उत्तरेस आहे, म्हणून इथले लोक हा धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत. दुर्बिणीद्वारे भारतीय लोक त्याला पाहू शकतात. हे मीन नक्षत्रच्या बाजूने वेगाने येत आहे. आपल्याला ते हिरव्या रंगात झपाट्याने चमकताना दिसेल. यानंतर, 23 मे रोजी, पृथ्वीजवळून आणखी एक धूमकेतू जाईल. त्याचे नाव धूमकेतु अ‍ॅटलस आहे. याला धूमकेतू सी / 2019 वाई 4 अ‍ॅटलस देखील म्हणतात. आतापर्यंत त्याचे अंतर कळू शकले नाही.

धूमकेतू अ‍ॅटलसचा शोध 28 डिसेंबर 2019 रोजी लागला. त्यावेळी त्याची ब्राइटनेस खूप हळू होती. पण आत्ता ते जास्त चमकत आहे. अ‍ॅटलासचे नाव अमेरिकेच्या हवाईयन बेटांवर अ‍ॅस्टेरॉइड टेरिस्ट्रियल इम्पॅक्ट लास्ट अ‍ॅलर्ट सिस्टम ( अ‍ॅटलस ) असे ठेवले गेले आहे. त्याचे स्वतःचे ट्विटर हँडल देखील आहे. हे पृथ्वीच्या बाजूने केव्हा येईल हे देखील माहित नाही, परंतु लवकरच पृथ्वीवरुन जाण्याची गती आणि वेळ वैज्ञानिकांना सापडेल. हे भारतातील लोक उघड्या डोळ्यांनी पाहू शकतील. अशी शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.