पोलिसांना महासंचालकांकडून मोठा ‘दिलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी आज पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा दिला आहे. ईद ए मिलाद व आयोध्या प्रकरणामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करणारा जो आदेश देण्यात आला होता. तो आजपासून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील पोलिसांना नियमित सुट्ट्या मिळण्यातील अडथळा दूर झाला आहे.

पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून आज सायंकाळी राज्यातील सर्व घटकप्रमुखांना वायरलेस पाठविण्यात आला असून त्यात ईद ए मिलाद सणामुळे २ नोव्हेंबरपासून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा जो आदेश दिला होत. तो आता मागे घेण्यात आला आहे.

आयोध्या प्रकरणाचा निकाल गेल्या शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या  दिवशी ईद ए मिलादनिमित्त राज्यभर मिरवणुका काढल्या जाणार होत्या. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा ताण पोलिसांवर होता. पोलिसांनी घेतलेल्या खबरदारीमुळे राज्यात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. राज्यातील वातावरण शांत असल्याने पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like