दिलासादायक ! थेऊरमधील ‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट

थेऊर- कोरोना संसर्गाचे रुग्ण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर सापडत असताना थेऊर येथील नागरिकांनी दाखवलेल्या संयमामुळे व वैयक्तीक सुरक्षेचे नियमन केल्याने गेल्या आठवडाभरात अ‍ॅक्टीव रुग्णाची संख्या झपाट्याने कमी झाली आहे अशीच प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास लवकरच आपणास या रोगावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात यश येईल.

अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे साधारणपणे दहा ते बारा हजार लोकवस्ती असून पर्यटकांची संख्या मोठी असते परंतु लाॅकडाऊनच्या काळात मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने सध्या तुरळक भाविक बाहेरून दर्शन घेऊन परततात.या गावात आजपर्यंत एकुण 164 कोरोना रुग्ण सापडले यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 152 रुग्ण कोरोनावर मात करुन आपापल्या घरी परतले आहेत सध्या केवळ चार रुग्ण रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत.

येथील आरोग्य कर्मचारी यामध्ये उपकेंद्र अधिकारी पुजा सुर्यवंशी आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार सेविका भारती सोनवणे तसेच सर्व आशा सेविका याच बरोबर ग्रामपंचायत कर्मचारी पोलिस प्रशासन आपापली चोख भूमिका पार पाडत आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार विना मास्क फिरणार्यावर कडक कारवाई करण्याचे नियोजन लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी योग्य रितीने राबवले यात अनेक नागरिकांना दंड करण्यात आला यामुळे गावातील परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मोठी मदत मिळाली सध्या प्रत्येक जण आपापली जबाबदारी ओळखून आहे त्यातही एखादा नियमाचे उल्लंघन करतो पण कोरोनाचे संक्रमण मात्र नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे